पेट्रोलचे थेंब उडाल्यानं वाद, कर्मचाऱ्यांकडून महिलेला मारहाण

Petrol diesel
Petrol diesel sakal
Updated on

नागपूर : पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी एका महिलेला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. कपड्यावर पेट्रोलचे थेंब उडाल्यावरून वाद झाला. त्यानंतर त्याचे रुपांतर हाणामारीत (Nagpur Petrol Pump Viral Video) झाले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Petrol diesel
काँग्रेसने उमेदवार बदलला, अपक्ष उमेदवार आणि बावनकुळेंमध्ये थेट लढत
महिलेला मारहाण करताना पेट्रोल पंपावरील कर्मचारी
महिलेला मारहाण करताना पेट्रोल पंपावरील कर्मचारीe sakal

नागपुरातील मेडिकल चौकात महिला पेट्रोल भरण्यास आली होती. तिने गाडीत पेट्रोल भरलं. त्यावेळी तिच्या कपड्यावर पेट्रोलचे काही थेंब उडाले. त्यामुळे तिने पुरुष कर्मचाऱ्यासोबत वाद घालत मारहाण सुरू केली. या व्हिडिओमध्ये पुरुष कर्मचारीही त्या महिलेला धावून गेल्याचे दिसत आहे. तसेच ती महिला देखील पुरुष कर्मचाऱ्याला मारताना दिसतेय. त्यानंतर पेट्रोल पंपावरील महिला कर्मचारी धावून आल्या. त्यानंतर त्यांनी संबंधित महिलेवर हल्ला केला. या महिला कर्मचारी भर रस्त्यावर महिलेला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पेट्रोलचे थेंब उडाल्यावरुन वाद -

कर्मचाऱ्यांनी आधी महिलेला पकडून जाब विचारला. मात्र, हा वाद इतका पुढे गेला की त्या महिलेलाच मारहाण सुरु झाली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पेट्रोल दरवाढीचा परिणाम म्हणून या घटनेकडे पाहिलं पाहिजे, अशी गमतीशीर चर्चाही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com