महिन्याला ३५०वर टेस्ट ट्यूब बेबींचा जन्म, जोडप्यांना अपत्यप्राप्तीचा आनंद

Test-tube-baby
Test-tube-babye sakal
Updated on

नागपूर : प्रत्येक विवाहित स्त्रीला मातृत्वाचा आनंद उपभोगता येत नाही. अलीकडे ऐन उमेदीच्या वयात गर्भधारणा न होणे ही समस्या बनली आहे. तरी संततीसुखाला पारखे झालेल्या जोडप्यांसाठी टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान वरदान ठरत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे उपराजधानीत दर महिन्याला साडेतीनशेवर टेस्ट ट्यूब बेबी (test tube baby) नैसर्गिकरीत्या जन्माला येतात. विशेष असे की, उपराजधानीत पहिल्या "टेस्ट ट्यूब बेबी‘चा जन्म ९ सप्टेंबर १९९७ रोजी झाला असून सध्या तो २४ वर्षांचा आहे. (Vitro Fertilizations Day 2021 more than 350 test tube baby birth in single month in nagpur)

Test-tube-baby
...तर जीवहानी होऊ शकली असती; सरकारने धोरण ठरवण्याची वेळ

जगात लंडन येथे २५ जुलै १९७८ मध्ये पहिल्या टेस्ट ट्यूबबेबीचा जन्म झाला. रॉबर्ट एडवर्ड यांनी प्रारंभी या तंत्रज्ञान संशोधनाला सुरवात केली. पॅट्रिक स्टेपटो या स्त्रीरोगतज्ज्ञाने त्यांना मदत केली. त्यामुळेच हा दिवस टेस्ट ट्यूबबेबी दिन मानला जातो. याच पार्श्वभूमीवर आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. मयूरी आसुदानी यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, देशात दहापैकी एक जोडपे वंध्यत्वाने ग्रस्त आहे. पुरुष आणि स्त्रींयामधील वंध्यत्वाचे प्रमाण प्रत्येकी ३५ टक्के आहे. तर ३० टक्के वंध्यत्व तणाव, जीवनशैलीतील बदलत्या सवयी, महत्त्वाकांक्षेमुळे उशिरा सुरू होणारे कुटुंब, पुरुषांमधील आदी कारणे असतात. मूल होण्याची तीव्र इच्छा असूनही विविध कारणांमुळे पालकत्वाचा आनंद घेऊ न शकणाऱ्या निपुत्रिक जोडप्यांना संततीसुखाचा आनंद या तंत्रज्ञानातून मिळत आहे. नागपुरात सुमारे १२ वर आयव्हीएफ सेंटर आहेत. या आयव्हीएफ सेंटरमध्ये दर महिन्याला साडेतीनशेवर निपुत्रिक जोडप्यांच्या घरी पाळणा हालतो आहे.

स्त्रीबीज-शुक्राणूचे जतन -

या उपचारपद्धतीद्वारे पहिल्या बाळाचा जन्माचा आनंद मिळाल्यानंतर सेंटरवर जतन केलेल्या स्त्रीबीज व शुक्राणूतून दुसरे मुलाच्या जन्माचा आनंद त्या जोडप्याला मिळू शकते. त्याशिवाय करिअर किंवा इतर कारणामुळे उशिरा मूल हवे असलेल्या पुरुषांना शुक्राणूचे जतन करता येते, त्याच प्रमाणे गर्भधारणेत महत्त्वाचा घटक असलेल्या स्त्री बीजांचेही पुढील २० वर्षे जतन करता येते, असे डॉ. मयूरी आसुदानी म्हणाल्या.

टेस्ट ट्यूब बेबी हे निसर्गनियमाप्रमाणे जन्माला येणारे बाळ आहे. हे बेबी इतरांप्रमाणेच निरोगी, सामान्य आयुष्य जगतात. गर्भधारणा स्त्रीच्या गर्भात होण्याऐवजी ती नलिकेत होते. यानंतर गर्भाशयात हा गर्भ सोडला जातो, येवढेच. स्त्रीबीज आणि शुक्राणू आईवडिलांचेच असतात. केवळ आयव्हीएफ या तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. इनव्हिट्रो फर्टीलायझेशन हे कृत्रिम गर्भधारणेचे तंत्र आहे. यात स्त्रीच्या बीजांडकोशातून स्त्रीबीज बाहेर काढले जाते. पुरुषांकडून शुक्रजंतू घेतले जातात. प्रयोगशाळेत स्त्रीबीज व शुक्रजंतू यांना एकत्र आणले जाते.
-डॉ. मयूरी आसूदानी, इंदिरा आयव्हीएफ सेंटर, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com