VNIT Nagpur Students Develop AI Railway Track Inspection Module
esakal
मंगेश गोमासे
नागपूर : रेल्वे अपघात टाळण्यासाठी महत्त्वाची ठरणारी तांत्रिक संकल्पना नागपूरच्या व्हीएनआयटी (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) येथील विद्यार्थ्यांनी टेस्ला क्लब ऑफ इनोव्हेशन या टेक्निकल क्लब मधे विकसित केली आहे. रेल्वे ट्रॅकमध्ये कुठेही बिघाड, तडे किंवा तांत्रिक दोष निर्माण होताच संबंधित यंत्रणेला तात्काळ अलर्ट मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांनी ‘रेल्वे ट्रॅक इन्स्पेक्शन मॉड्युल’ तयार केले आहे. विशेष म्हणजे, हे मॉड्युल रेल्वे सुरू असतानाही ट्रॅकवरच राहणार असल्याने त्याला ट्रॅकवरून हलविण्याची गरज पडणार नाही.