
नागपूर : आज राज्यात विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून प्रत्येकाने त्याचा हक्क बजावत मतदान करणे अत्यंत गरजेचे आहे. लोकांनी लोकांसाठी लोकशाही पद्धतीने चालविलेल्या राष्ट्रात मतदान करण्याचा अधिकार आपल्याला मिळाला आहे. त्यामुळे या अधिकाराच्या उत्सवात प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हायलाच हवे.