किर्ररऽऽऽ भयाण काळोखात, जलमग्न परिसरात, झाडाच्या आश्रयाने जागून काढली रात्र, मग काय झाले, वाचा...

पारशिवनीः पुरात अडकलेल्यांच्या मदतीकरीता हेलिकॉप्टरमधून परिस्थितीचा आढावा घेताना प्रशासनातील अधिकारी.
पारशिवनीः पुरात अडकलेल्यांच्या मदतीकरीता हेलिकॉप्टरमधून परिस्थितीचा आढावा घेताना प्रशासनातील अधिकारी.

कामठी (जि.नागपूर) : शनिवारची काळी भयाण रात्र, सभोवताली कन्हान नदीच्या पुराचे वेढलेले पाणी, बाहेर पडायला मार्ग नाही.अशा स्थितीत कुणीतरी धावून येईल, ही खुळी आस...शेवटी कोसळणाऱ्या पावसात उपाशी पोटी त्या गुराख्यांना रात्र काढावी लागली.   काल कन्हान नदीला आलेल्या पुराने तालुक्यातील बिनासंगम, बीडबिना, सोनेगावराजा, उनगाव, चिकना, भामेवाडा या गावांना पुराने वेढल्याने सोनेगावराजा, चिकना गावात नागरिक अडकले. प्रशासनाच्या वतीने एसडीआरफ पथकाच्या साहाय्याने बचावकार्य करून नागरिकांना सुरक्षित हलविण्यान आले.

अधिक वाचाः Video : नागपुर जिल्ह्यात पाणी भर "पूर" ; हेलिकॉप्टरद्वारे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा
 

५५० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले
कन्हान नदीला आलेल्या महापुराने कामठी तालुक्यातील कन्हान नदी काठावरील बीडबिना, बिनासगम, गोराबाजार, छोटी आजनी, आजनी (रडके) नेरी, सोनेगावराजा, उनगाव, चिकना, भामेवाडा या गावात पुराचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कन्हान नदीच्या पुराने वेढलेल्या  चिकना येथे सकाळी नऊ वाजता सुमारास एसडीआरफ पथकाचे अधिकारी ललित मिश्रा, स्थायी समिती सदस्या प्रा. अवंतिका  लेकुरवाळे, मंडळ अधिकारी महेश कुलदीपवार, संजय अनवाने यांच्या उपस्थितीत बोटद्वारे बचाव कार्याला सुरुवात करून ११० कुटुंबातील ५५० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून त्यांची जिल्हा परिषद शाळेत निवासाची सोय करण्यात आली. सोनेगावराजा येथे  नायब तहसीलदार रणजित दुसावार, आर.टी. उके यांच्या मार्गदर्शनात बचावकार्य करून पुरात अडकलेल्या २० कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्यांची जेवणाची सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.

अधिक वाचाःनिसर्ग चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या महाराष्ट्रापर्यंतच्या मिळाला वाटचालीला वेग
 

अखेर वृद्धाची सुखरूप सुटका
जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यूपथक दुपारी दोन वाजता सुमारास पाठवून नागरिकांना  सुरक्षित स्थळी हलविले. बिनासंगम येथील कन्हान नदी काठावरील मंदिरात तीन नागरिक पुरात अडकले होते. त्यांनाही रेस्क्यू पथकाने बाहेर काढले. सोनेगावराजा याही गावाला कन्हान नदीच्या पुराने वेढले होते. या गावातील जुन्या गावठाण भागात ६५ वर्षीय शंकर वादाफडे नामक वृध्द अडकला असल्याचे आज लक्षात आल्याने रेस्क्यूपथकाने त्याला सुखरूप बाहेर काढले. आजनी (रडके) गावाला पुराच्या पाण्याने वेढल्याने कामठी गुमथला मार्ग बंद करण्यात आला. येथील नागरिकांना स्थानिक सरस्वती आयटीआयमध्ये राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सायंकाळी उशिरा शहराला लागून असलेल्या बागडोरा नाल्याने आलेल्या बॅकवॉटरमुळे शहरातील प्रभाग क्रमांक तीन जुनी खलाशी लाईन येथील नागरिकांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. छोटी आजनी येथील पाली कुटुंबातील तीन सदस्यांनी वडाच्या झाडाखाली रात्र जागून काढली. कन्हान नदी काठावरील छोटी आजनी  ही वस्ती कन्हान नदीच्या पुरात  पूर्णपणे बुडाली होती. त्यामुळे येथील नागरिकांना बाहेर हलविण्यात आले होते.

पालकमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागाला भेट
जिल्हयाचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, तहसीलदार अरविंद हिंगे यांच्यासह सकाळी दहा वाजता सुमारास तालुक्यातील बिनासंगम येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांसोबत चर्चा केली. नुकसानग्रस्त भागाचे प्रशासनाच्या वतीने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.  माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार टेकचंद सावरकर यांच्यासह छोटी आजनी भागाला भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी छोट्या आजनीचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. पेंच प्रकल्पाचे सोडलेल्या १६ गेटचे पाणी कन्हान नदी विसर्ग झाले असता नदीकाठावरील गावे पूरग्रस्त झालीत. यानुसार रडके आजनी गावाचा संपर्क  तुटला. मोक्षधामचा जवळपास ३० फूट खोल असलेला राणी तलाव तुडुंब भरला होता, तसेच आजनी गावापासून ते कामठी घनकचरा व्यवस्थापन केंद्रापर्यंत असलेला पाण्याचा वेढा दिला होता. आजनी मार्ग हा बंद असल्याने ग्रामस्थांचा संपर्क तुटला.

हेही वाचाः  मोठी बातमी :  नागपूर जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले; अख्खा हंगामच धोक्यात, वाचा सविस्तर
 

१२४० कुटुंबे प्रभावित
पारशिवनीः शनिवारी पेंच नदीचे १६ दरवाजे ६ मीटरने उघडल्यामुळे पेंच नदीवरील सालई माहुली हा पूल तुटला तर नयाकुंड येथील पूल क्षतिग्रस्त झाला. त्यामुळे पारशिवनीसह इतर गावांचा रामटेक व आमडी फाटामार्गे नागपूरशी संपर्क तुटला.  सोबतच सिंगोरी येथील पुलाला देखील भगदाड पडले. तालुक्यातील सिंगारदिप, निलज, गवना, पालोरा, डोरली, पाली, उमरी, सालई, कन्हान पिपरी, नांदगाव, नेउरवाडा, जुनीकामठी, गाडेघाट ही गावे पुरामुळे आद्यपदेखील प्रभावित आहेत. तालुक्यात पेंच नदीला आलेल्या पुरामुळे १२४० कुटुंब प्रभावित झालेली आहेत. यातील ४७४२ सदस्यांना तहसीलदार वरूनकुमार सहारे यांच्यामार्फत अन्नधान्य व फूड पॉकेट पुरविण्यात आले आहे. सिंगारदीप हे गाव चहूबाजूनी पुराच्या पाण्याने वेढलेले असल्यामुळे या गावात प्रशासनाच्या वतीने हेलिकॉप्टरद्वारे अन्न पिशव्या टाकण्यात आल्या.

 
संपादन  :
विजयकुमार राऊत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com