esakal
नागपूर
Wardha Crime : 25 वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला टी-शर्टने घेतला गळफास; लग्नासाठी पैसे नसल्याने होता तणावात
25-Year-Old Farmer Found Dead in Savarkheda Village, Wardha District : वर्धा जिल्ह्यातील सावरखेडा गावात हर्षल राऊत या २५ वर्षीय तरुणाने भावबीजेच्या रात्री शेताच्या बांधावर गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस तपास सुरू आहे.
समुद्रपूर (जि. वर्धा) : तालुक्यातील सावरखेडा गावातील २५ वर्षीय तरुणाने भाऊबीजेच्या रात्री आपल्या शेताच्या बांधावर गळफास लावून आत्महत्या (Wardha Crime) केली. हर्षल राऊत मृताचे नाव असे असून तो शेतकरी नथ्थुजी राऊत यांचा मुलगा आहे.
