esakal | मेडीकलचे वॉचमन रुग्णांना करतात दमदाटी; चिकणाचे उपसरपंच कळंबे यांची आपबिती

बोलून बातमी शोधा

मेडिकल
मेडीकलचे वॉचमन रुग्णांना करतात दमदाटी; कोरोनाग्रस्तांच्या भावनांशी खेळ
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कुही (जि. नागपूर) : तालुक्यातील चिकणा ग्रामपंचायतीचे उपसरपंच तुळशीदास कळंबे हे शासकीय वैद्यकीय रुग्णालय नागपूर येथे कोरोनावर औषधोपचार कोविड वार्ड क्र.४९ उपचार घेत आहेत. या वार्डात कुलर व पंखे बंद असून दार उघडे ठेवले तर तेथील वाचमन रुग्णांना दमदाटी करीत असल्याची तक्रार कळंबे यांनी केली आहे.

हेही वाचा: गडचिरोलीला प्राणवायू पुरविण्यासाठी 'ते' सरसावले; भरून दिले 200 ऑक्‍सिजन सिलिंडर

या वार्डात सर्वच रुग्णांना हा त्रास होत आहे. शासन व प्रशासनातील पदाधिकारी व अधिकारी सर्व ‘ऑल इज वेल’ असल्याच्या बाता करतात. मात्र प्रत्यक्ष भरती झालेल्या रुग्णांची कशी हेळसांड होते, याचे ज्वलंत उदाहरण ऊपसरपंच तुळशीदास कळंबे यांनी समोर आणले आहे.

आता कडाक्याचे उन्ह आहे, अशा परीस्थीतीत चांगल्या व्यक्तीचा जीव उन्हामुळे कासावीस होतो, तर कोविड वार्ड क्र.४९मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे कसे हाल होत असतील, याचा अंदाज आपण लाऊ शकतो. कुही तालुक्यातील कोरोनाचे रुग्ण शासकीय मेडीकल व‌ मेयो कॉलेज व रुग्णालयात उपचार घेत आहेत.

हेही वाचा: विदर्भ वासियांनो, तुम्ही निवडून दिलेल्या आमदारानं किती दिला कोरोना निधी; जाणून घ्या

त्यांना काही अडचणी भासत असतील तर आमदार राजू पारवे, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच जि.प.सदस्य यांनी मदत करावी, अशी विनंती चिकणा ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सध्या उपचार घेत असलेले तुळशीदास कळंबे यांनी केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ