
Nagpur News
sakal
नागपूर : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (मेडिकल) लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (आयसीयु) गेल्या काही तासांपासून वॉर्ड क्रमांक २५ मधील बाथरूम तुंबल्याने घाण पाणी आयसीयूच्या आतमध्ये पसरले असून, यामुळे आधीच गंभीर अवस्थेत असलेल्या लहान मुलांच्या जीवावर बेतले आहे. ज्यामुळे सदर गंभीर परिस्थितीमुळे प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.