Nagpur Water Park Tragedy: वॉटर पार्कमधील पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू; बाजारगाव परिसरातील घटना, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Child Dies by Drowning in Nagpur Water Park : नागरिक आणि मृताच्या कुटुंबियांनी पोलिस अधीक्षकांना संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत कोंढाळी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.
Water Park Accident Claims Life of Young Child in Bazargaonesakal
धामणा (लिंगा) : नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बाजारगाव परिसरातील फन अँड फुड वॉटरपार्क येथे शहरातील मनीषनगरमधील ७ वर्षांच्या नैतिक अमित देशमुख या चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.११) घडली.