Fire Accident: चितेला डिझेल टाकून प्रचंड आग; वाठोडा अंत्यविधीत होरपळलेल्या पाच जणांपैकी दुसऱ्याचा मृत्यू
Nagpur News: वाठोडा दहनघाटावर चितेला अग्नी देताना आगीचा भडका होऊन पाच जण होरपळले होते. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक होती. यापैकी एकाचा आधीच मृत्यू झाला होता.
नागपूर : वाठोडा दहनघाटावर चितेला अग्नी देताना आगीचा भडका होऊन पाच जण होरपळले होते. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक होती. यापैकी एकाचा आधीच मृत्यू झाला होता. आता उपचारादरम्यान दुसऱ्याचाही मृत्यू झाला.