
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर ओपन कास्ट कोळसा खाण मसाळा (तुकुम) गावापासून १ हजार ९०० मीटर अंतरावर आहे. नियमानुसार त्याचा गावावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे, गावाच्या पुनर्वसनाची गरज नसल्याचे उत्तर वेस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेडने (डब्लूसीएल) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिले आहे. यावर, अतीरिक्त शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने डब्लूसीएलला दिले.