WCL Officer Bribe Case : बिलासाठी मागितली ५० हजारांची लाच डब्ल्यूसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सीबीआयच्या जाळ्यात

₹50,000 Bribe Demanded for Bill Clearance : डब्ल्यूसीएलच्या उमरेड क्षेत्रातील वरिष्ठ ओव्हरसिअर पवन नखाते याला कामाचे बिल मंजूर करून रक्कम सोडण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली.
WCL Officer Bribe Case

WCL Officer Bribe Case

esakal

Updated on: 

नागपूर : कामाचे बिल मंजूर करून रक्कम सोडण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागून त्यातील ४० हजार रुपये स्वीकारताना वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या (डब्ल्यूसीएल) उमरेड क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी पवन नखाते याला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी रंगेहात अटक केली.

नखाते हे गोकुळ मुरपार सब एरिया, उमरेड एरिया येथे वरिष्ठ ओव्हरसिअर (सिव्हिल) म्हणून कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला डब्ल्यूसीएलकडून पिरवा गावाच्या पुनर्वसनस्थळी पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी दोन बोअरवेल खोदणे, सबमर्सिबल पंप बसविणे तसेच अंतर्गत मुख्य व वितरण पाइपलाइन टाकण्याचे कंत्राट मिळाले होते. या कामाच्या तिसऱ्या बिलाची रक्कम मिळण्यासाठी नखाते याने २५ लाख ३५ हजार ६९३ रुपयांच्या बिलाच्या दोन टक्के म्हणजे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत २९ सप्टेंबरला सीबीआयकडे लेखी तक्रार करण्यात आली.

त्यानंतर त्याच दिवशी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी नखाते याने सुमारे २२ लाखांच्या देय रकमेच्या दोन टक्के म्हणजे ४४ हजार रुपये, तसेच यापूर्वीच्या व्यवहारातील १० हजार रुपयांची थकीत अशी एकूण ५४ हजार रुपयांची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. तडजोडीनंतर त्यांनी ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ मधील कलम ७ अन्वये नखाते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

त्यानंतर बुधवारी (ता.३०) सापळा रचून उमरेड येथील गंगापूर चौकाजवळ तक्रारदाराची भेट घेतल्यानंतर नखाते याला ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताच सीबीआयच्या पथकाने रंगेहात पकडले. नंतर त्याला अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Timber Transport Bribe
Rajasthan ACB Action in Udaipur
Satara Shahupuri Police Bribe Case
Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe
Marathi News Esakal
www.esakal.com