Nagpur News : ‘हम नासमझ थे, उॅंट फसे, हम भी फस गये’ ;साजन रबारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

camel
नागपूर : ‘हम नासमझ थे, उॅंट फसे, हम भी फस गये’ ;साजन रबारी

नागपूर : ‘हम नासमझ थे, उॅंट फसे, हम भी फस गये’ ;साजन रबारी

नागपूर : ‘‘अभी तुम्हारे उॅंटो को डाॅक्टर चेक करेंगे. अभी रूक जावो उंटो के फोटो निकालना है. आओ जरा चाय तो पिओ. ऐसा बोलके हमारा टाईमपास किया. फिर बोला के स्टे ऑर्डर मिला है. अभी उॅंट लेके नही जा सकते. हम नासमझ थे. उनकी बहकावे में फस गये.’’ साजन रबारी संपूर्ण घटनाक्रम सांगताना रडवेले झाले होते.

हेही वाचा: कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष

चांदूररेल्वे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याने ५८ उंटांना सोडण्याचा आदेश २५ तारखेलाच दिला होता. अमरावतीतील विमलनगर येथील गोरक्षण संस्थेला उंटाच्या देखरेखीचा खर्च देण्यात यावा, असे आदेशात म्हटले होते. त्यानुसार पैसे भरले. ते भरतानाही आमचा टाईमपास करण्यात आल्याचा आरोप साजन रबारी यांनी केला. ‘‘पह्यले बोला गया कॅश जमा करो. कॅश लेके गये तो बोले बॅंके से अकाऊंट में डालो. तब तक श्याम हो चुकी थी. बॅंक बंद हो चुकी थी. फिर जैसे तैसे हमने ऑनलाईन ट्रान्सफर किया. इसमे गुरुवार की रात हो चुकी थी. फिर दिनभर टाईमपास किया. हमारे ध्यान में नही आया साब.’’ स्वतः जाळ्यात फसल्याची भावना साजन रबारी यांच्या मनात होती.या संबंधाने गोरक्षण संस्थेच्या वतीने ॲड. अटल यांच्याशी दूरध्वनीहून प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले, ‘‘इन्होनें चोर चपाटे से उंट लाए. बगर प्रुफ के उंट मायग्रेट कैसे कर सकते है? हमें उंट राजस्थान वापस भेजने है.’’ ५८ उंटांचे प्रकरण अनेक वळणे घेत आहेत. हैदराबाद येथील प्राणीमित्र संघटनेचे जसराज रूपचंद यांनी उंटांना कत्तलीसाठी नेत असल्याची तक्रार केली होती.

हेही वाचा: शिक्षणासाठी रंजनाचा सुरू आहे असा प्रवास ; हा संघर्ष नक्कीच अनेक युवतींना प्रेरणादायी आहे

चांदूररेल्वे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी उंट सोडण्याचा आदेश दिला. परंतु आता या प्रकरणात नवीनच संस्थांनी स्टे मिळविला. पशुपालक रबारींच्या वतीने ॲड. मनोज काल्ला केस लढत आहेत. ‘‘न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तातडीने उंट सोडले असते तर ही वेळ आली नसती’’, असे ते म्हणाले.

वर्धा येथे डेरा टाकून असलेले मशरू रबारी यांनी विकत घेतलेला एक उंट यात आहे. ते आणि पर्बत रबारी या खटल्यासाठी लागणारी संभाव्य रक्कम गोळा करण्यासाठी सुरतकडे रवाना झाले आहेत. उंट जेवढे दिवस गोशाळेत ठेवले जातील तेवढी खावटीची रक्कम जमा करावी लागेल. केव्हढ्यात उंट पडेल, या चिंतेत पशुपालक आहेत.

पह्येलही हमारे बहोत पैसे खर्च हुए है. और कितने खर्च करेंगे. उंट हमारे है. देख लो. खुदके जानवर को काटने के लिए हम कैसे लेके जाएंगे. जनावर काटने के लिए लेके जाने वाले जगह से उठाते है और खुद लेके जाते है.

-पर्बत रबारी, पशुपालक

Web Title: We Were Stupid Camels Were Trapped We Were Also Trapped

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top