Accident: रात्री खर्रा आणण्यासाठी गेला अन् वाहनाने चिरडले

Bike Accident: गंभीर जखमी झाल्याने त्याला मेयोत नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
Accident: रात्री खर्रा आणण्यासाठी गेला अन् वाहनाने चिरडले

Nagpur: गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सांदीपनी शाळेसमोर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.७) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

राहुल टेकचंद खैरवार (रा. ईमली टेकरा, भरवेली माईन्स, बालाघाट, मध्यप्रदेश, ह.मु. चिंतामणीनगर, भिवसनखोरी) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो रात्री जेवण झाल्यावर खर्रा आणण्यासाठी दुचाकी (एम.ए. ४९ आर ०४३६) घेऊन निघाला. रस्त्यात त्याला सांदिपनी शाळेजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला मेयोत नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी दिनेश ताराचंद देवाधारी (वय ३८, रा. चिंतामणीनगर, भिवसनखोरी) यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मेडिकल स्टोर्समधून सव्वा लाख लंपास

नागपूर ः जरीपटका पोलिस हद्दीतील समतानगरात मेडिकल स्टोर्सचे शटर वाकवून दुकानातील कॅश काऊंटरमधून १ लाख १२ हजार रुपयांची रोख आणि साहित्य चोरले. ही घटना सोमवारी (ता.७) सकाळी उघडकीस आली.

अक्षय गरीबा नवनागे (वय २५, रा. सुमेधनगर) यांचे समतानगरात बारूना मेडिकल स्टोर्स आहे. रविवारी रात्री पावणेअकरा वाजताच्या सुमारास दुकानाच्या शटरला कुलूप लावून ते घरी गेले. सकाळी त्यांना परिसरातील परिचिताचा फोन आला त्याने दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले. त्यांनी दुकानात येऊन बघितले असता, कॅश काऊंटरमधून १ लाख १२ हजार १५० रुपयांची रोख चोरी झाल्याचे दिसले. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, तपास सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com