मनोविकृती चिकित्सकांना मॅड करण्याचा खेळ, कुणाकडून सुरू आहे हा प्रकार...

https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/wait-their-bonus-life-read-304578
https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/wait-their-bonus-life-read-304578

नागपूर : राज्यात पुणे, रत्नागिरी, ठाणे आणि नागपूर अशी चार प्रादेशिक मनोरुग्णालये आहेत. या मनोरुग्णालयांत मनोविकृती चिकित्सकांची ७९ पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ २२ पदे भरलेली आहेत. उर्वरित सर्व पदे रिक्त आहेत. राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवेत मनोविकृती चिकित्सक पदे भरण्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. दोन वर्षे लोटून गेली; मात्र मॅटने अद्याप न्याय दिला नाही. मनोविकृती चिकित्सकांना प्रतीक्षेत ठेऊन मनोरुग्ण होण्याची वाच तर पाहत नाही ना, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. 

स्पर्धात्मक युगात मानसिक आरोग्याचा गुंता दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मनोविकृती चिकित्सक तज्ज्ञांची कमतरता आहे. ही बाब लक्षात घेत राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवेत मनोविकृती चिकित्सक पदे भरण्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. मात्र, कोण्या शुक्राचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रकरण मॅटमध्ये न्यायप्रविष्ट केले. दोन वर्षे लोटून गेली; मात्र मॅटने अद्याप न्याय दिला नाही. यामुळे मुलाखती देणारे राज्यभरातील मनोविकृती चिकित्सक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. 

नागपूर, ठाणे, रत्नागिरी आणि पुणे शहरात मनोरुग्णालये असून, साडेपाच हजार खाटांची क्षमता आहे. यातील नागपूरच्या मनोरुग्णालयात ९४० खाटा, पुण्यात २४००, ठाण्यात १८०० तर रत्नागिरी येथील ४०० खाटांची क्षमता आहे. या खाटांच्या तुलनेत रुग्णांची संख्याही भरपूर असते. परंतु, मनोरुग्णालयात मनोविकृतीचिकित्सक तज्ज्ञांचा तुटवडा आहे. 

नागपुरात ९ पदे आहेत. यातील अवघ्या दोन तज्ज्ञांची पदे भरली आहेत. हेच रिक्त पदांचे विदारक वास्तव इतर ठिकाणी पुढे आले आहे. ही बाब लक्षात घेत २०१७ मध्ये सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २० मनोविकृती चिकित्सकांची पदे भरण्याची जाहिरात प्रकाशित केली. मात्र, काही उमेदवारांचे अर्ज एमपीएससीने अवैध ठरवले. यामुळे त्या शुक्राचाऱ्यांनी मॅटमध्ये तक्रार दाखल केली. त्यावेळी या अपात्र उमेदवारांनाही पुढे मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. त्यांनीही मुलाखती दिल्या. मात्र, मॅटमधून अद्यापही या प्रकरणात निकाल न दिल्यामुळे मुलाखतीमध्ये यश प्राप्त करणारे मनोविकृती चिकित्सक मात्र नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. 

तज्ज्ञांना करानी लागते तारेवरची कसरत 
‘मेंटल हेल्थ ऍक्‍ट'नुसार तसेच एका ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शंभर मनोरुग्णांमागे एक मनोविकारतज्ज्ञ आवश्‍यक आहे. एक मनोविकारतज्ज्ञ शंभरपेक्षा जास्त मनोरुग्णांची काळजी घेऊ शकत नाही. परंतु, रिक्त पदांमुळे राज्यभरातील चारही मनोरुग्णालयात मनोविकृतीचिकित्सक तज्ज्ञांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

राज्य सरकारने घ्यावा पुढाकार 
२०१७ मध्ये प्रकाशित जाहिरातीनुसार मनोविकृतीचिकित्सक पदासांठी सुमारे शंभरावर मनोविकृती चिकित्सकांच्या मुलाखती झाल्या. मात्र, मॅटमध्ये प्रकरण मॅटप्रविष्ट झाल्याने लवकरच होणारी मनोविकृती चिकित्सक पदाची नियुक्ती दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही ‘जैसे थे’ आहे. विद्यमान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणात पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com