मतदारांच्या सुप्त संतप्त लाटेचा फटका कुणाला?
Nagpuresakal

Nagpur : मतदारांच्या सुप्त संतप्त लाटेचा फटका कुणाला?

वाशीम-यवतमाळ, बुलडाण्यात शिवसेना तर अमरावती, वर्ध्यात भाजपला टेन्शन!
Published on

नागपूर ः २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकत्र लढलेले पक्ष २०२४ च्या निवडणुकीत कट्टर राजकीय शत्रू झाले आहेत. गेल्या दीड वर्षांत महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे मतदार निराश आणि संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसणार हे निश्चित मानले जात आहे.

मतदारांच्या सुप्त संतप्त लाटेचा फटका कुणाला?
Nashik ZP News : जि. प. कर्मचारी बँकेस 2 कोटी 15 लाखाचा नफा

गेल्या २५ वर्षांपासून पश्चिम विदर्भ हा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचा गड मानला जात आहे. बुलडाणा, वाशीम-यवतमाळ, अमरावती, अकोला या मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपचे वर्चस्व राहिले आहे. पण, यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे वर्चस्व राहील का एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे, याची उत्सुकता आहे.

मतदारांच्या सुप्त संतप्त लाटेचा फटका कुणाला?
Nashik News : एमपीसिबीतर्फे उद्योगांना बँक गॅरंटीबाबत नोटीस; उद्योगांकडून ऑनलाइन अपलोड पण प्रत्यक्षात दाखवला ठेंगा

बहुरंगी लढतीची शक्यता !

राजमाता जिजाऊंच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मातृतीर्थ बुलडाणा मतदारसंघात यावेळी थेट ऐवजी बहुरंगी लढती होतील, असा अंदाज आहे. राज्यस्तरापासून स्थानिक ठिकाणापर्यंत सर्वच राजकीय समीकरणे बदलल्याने आजवर पारंपरिक काँग्रेस आणि शिवसेना अशी थेट लढत न होता यावेळी दोन तुल्यबळ अपक्ष, वंचित बहुजन आघाडी या उमेदवारांमुळे ही बहुरंगी लढत अपेक्षित आहे.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून खासदार प्रतापराव जाधव यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रा. नरेंद्र खेडेकर हे उमेदवार आहेत. स्पर्धेतील पहिल्या दोन उमेदवारांसोबतच खालोखाल मते घेणाऱ्या बहुजन वंचित आघाडीने यावेळी वसंतराव मगर यांना संधी दिली आहे. याशिवाय तुल्यबळ अपक्षांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर व बुलडाणा मिशनचे संदीप दादा शेळके हेही उमेदवार आहेत. हे सर्वजण बहुसंख्येने असलेल्या मराठा-कुणबी समाजातून येतात. त्यामुळे चौघांमध्ये मत विभाजन होणार हे निश्चित आहे. परंतु आता हे किती प्रमाणावर होते? यासाठी निकालाची वाट पहावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com