बावनकुळेंचा संपर्क दांडगा असूनही भाजपने गड का राखला नाही?

why bjp not won graduation constituency election in nagpur
why bjp not won graduation constituency election in nagpur
Updated on

नागपूर : माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राज्याचे निवडणूक प्रमुख पद देऊन सेनापती तर बनवले. पण हे करण्याआधीच त्यांची कवच-कुंडलं आणि शस्त्रसाठा काढून घेतला. पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशींचा पराभव होण्यामागे हेसुद्धा एक कारण मानले जात आहे. पराभवाची कारणमीमांसा करताना अनेक बाबी समोर येत आहेत. कार्यकर्त्यांच्या मते त्यांपैकी हीसुद्धा एक बाब असू शकते. 

राजकारणात जिल्हा परिषद सदस्य, नंतर आमदार आणि राज्याचे ऊर्जामंत्री, असा दांडगा अनुभव त्यांचा आहे. याशिवाय नागपूर, भंडारा आणि वर्धा या तीन जिल्ह्यांचे पालकत्वसुद्धा त्यांनी सांभाळेलेले आहे. त्यांचा दांडगा अनुभव आणि पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील त्यांचा वावर आणि संपर्क या जोरावर गेल्या ५८ वर्षांपासून असलेला भाजपचा गड आपण निश्‍चितच राखू, असा विश्‍वास श्रेष्ठींना होता. पण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांचा अनुभव आणि अभ्यासही कामी आला नाही आणि भाजपने आपला मजबूत गड अखेरीस गमावला. 

बावनकुळेंनी प्रामाणिकपणे किल्ला लढवला. पण २०१९ च्या विधानसभेत त्यांची उमेदवारी कापल्याने नाराज झालेला त्यांचा कार्यकर्ता खरंच लढाई म्हणून ही निवडणूक लढला की नाही, याबाबत साशंकता आहे. कारण पक्षाने 'त्यांना निवडणूक प्रमुख बनवून लढाईवर पाठवले. पण त्याआधी त्यांची कवच-कुंडले आणि शस्त्र काढून घेण्यात आले. त्यामुळे बिनाशस्त्राने ते कसे लढले असतील?', असे त्यांचे कार्यकर्ते खासगीत चर्चेदरम्यान बोलत आहेत. बावनकुळे  आज आमदार जरी असते, तर कदाचित या निवडणुकीचे निकाल काही वेगळे लागले असते, असंही काही कार्यकर्त्यांचं मत आहे. त्यामुळे बावनकुळेंची कवच-कुंडलं काढून घेऊन आणि शस्त्राविना सेनापती म्हणून लढाईवर पाठवल्यामुळे भाजपला हा पराभव बघावा लागला का, या प्रश्‍नाचे उत्तर पक्षश्रेष्ठींनी शोधणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com