

नागपूर : कोरोनामुळे (coronavirus) उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील विधवा महिला, अनाथ मुलांना विशेष सहाय्य योजनेतून (special help scheme) अनुदान दिले जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात जवळपास ४०० सेतू केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध केली आहे. पण, योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास नेमक्या कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, हे पाहुयात.
वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, अपंगाचे प्रमाणपत्र, असमर्थतेचा, रोगाचा दाखला, अपंग असल्याचे प्रमाणपत्र, अशा जुजबी प्रमाणपत्राच्या सादरीकरण करावे. त्यानंतर महाऑनलाईन केंद्र किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रात अर्ज सादर केल्यानंतर या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी स्वतः नागरिकांनी देखील पुढे यावे. तहसील कार्यालय, नगर परिषद, सर्व महा ऑनलाईन केंद्र सेतू केंद्र या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे.
प्रत्येक गावातील, शहरातील सर्व दारिद्रय रेषेखालील नागरिक यासाठी पात्र आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना याचा लाभ मिळेल यासाठी शासकीय यंत्रणा, सामाजिक संघटनांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. विशेष सहाय्य योजनेतंर्गत राज्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमार्फत अंध, अपंग, शारीरिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, निराधार, विधवा, परितक्त्या, देवदासी तसेच ६५ वर्षावरील निराधार वृद्ध यांना राज्य शासनामार्फत एक हजार रुपये दर महिन्याला अर्थसहाय्य वितरित करण्यात येते.
तसेच केंद्र पुरस्कृत दारिद्र रेषेखालील वृद्ध व्यक्तींसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, विधवा महिलांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, दिव्यांग व्यक्तींसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील ५९ वर्षापेक्षा कमी वय असलेला कर्ता पुरुष किंवा स्त्री मरण पावल्यास वीस हजार रुपये, एकरकमी अर्थसहाय्य वितरित करण्यात येते.
दरम्यान, कोरोनामुळे उद्धवस्त झालेल्या कुटुंबांना सावरण्यासाठी सामाजिक, राजकीय, संस्थात्मक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी संस्थांनी प्रशासनासोबत मदतीसाठी पुढे यावे. तसेच लाभधारकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.