
नागपूर : पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा नाकतोंड दाबून खून केला. ही घटना रविवारी (ता.५) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकर या दोघांनाही अटक करण्यात आली. चंद्रसेन बाळकृष्ण रामटेके (वय ३८, रा. साईनाथ सोसायटी, तरोडी खुर्द, वाठोडा) असे मृताचे नाव असून दीक्षा चंद्रसेन रामटेके (वय३०) आणि आसिफ राजा इस्लाम अंसारी ऊर्फ राजा बाबू टायरवाला (वय २८, रा. राजनगर, वाठोडा) असे आरोपींची नावे आहेत.