

Chandrashekhar Bawankule
sakal
नागपूर: महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातील नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील, असा विश्वास महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.