esakal | 'पदवीधर निवडणूक गमावलीत आता महापालिका गमावू नका"; नितीन गडकरींचं स्थानिक नेत्यांना आवाहन

बोलून बातमी शोधा

winning is must in Nagpur NMC elections said Nitin Gadkari to BJP leaders

भाजपच्या स्थापनादिन कार्यक्रमात ते बोलत होते. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. एक बटन दाबली आणि सर्वत्र दिवे लागले असा काही चमत्कार झालेला नाही.

'पदवीधर निवडणूक गमावलीत आता महापालिका गमावू नका"; नितीन गडकरींचं स्थानिक नेत्यांना आवाहन
sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर ः सर्वच पक्ष आपल्या विरोधात आहे. त्यामुळे येणार काळ आव्हानात्मक आहे. जिल्हा परिषद आणि त्यापाठोपाठ विभागीय पदवीधर मतदारसंघ आपण गमावला. आता नागपूर महापालिका हातून जाऊ देऊ नका, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी त्यांनी नेत्यांना गटबाजी करू नका असा सल्लाही दिला.

भाजपच्या स्थापनादिन कार्यक्रमात ते बोलत होते. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. एक बटन दाबली आणि सर्वत्र दिवे लागले असा काही चमत्कार झालेला नाही. यामागे निष्ठावान कार्यकर्ते आणि त्यांच्या मेहनत आहे. सत्ता आणि संपत्ती आली की खऱ्या अर्थाने भांडणे सुरू होतात. राजकीय हेवेदावे निर्माण होतात. सत्तेसोबत काही गुणदोषही येतात. सत्तेच्या मस्तीत केलेली एक चूकही उध्वस्थ व्हायला वेळ लागत नाही. 

'मुलांनो! मला माफ करा...यापुढे मी तुम्हाला आईचे प्रेम देऊ शकत नाही', पतीच्या विरहात...

एकेकाळी देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसचे मोठमोठे आज दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सावध आणि संयमी राहणे आवश्यक असल्याचे गडकरी म्हणाले.

भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष आणि परिवार आहे. आज केंद्रात सत्ता आहे. महाराष्ट्रातही होती. महापालिकेत आपण पंधरा वर्षांपासून राज्य करीत आहोत. हीच भाजपची ताकद आहे. निवडणूक जिंकणे दहीहंडी फोडण्यासारखे असते. एकावर एक मनोरे करीत उंच चढत जावे लागते. मधला एक कार्यकर्त्यासुद्धा अडखळला तर मनोरा कोसळतो. त्यामुळे आपल्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्या हा महत्त्वाचा आहे. त्याचा मानसन्मान राखणे आवश्यक आहे. या गटाचा, त्या तटाचा असे संबोधून त्याला दूर सारू नका. हा माझा तो तुझा असे वागू नका असा सल्ला देताना गडकरी यांनी भाजपमध्ये शिरलेल्या गटबाजीवरही अप्रत्यपणे टीका केली.

'यशवंत स्टेडियमचा चेहरा मोहरा बदलणार; म्युझियम, गेस्ट हाऊस आणि पार्किंगचा समावेश':...

ज्यांना मिळाले त्यांच्यामुळे समस्या

ज्यांना काहीच मिळाले नाही त्यांची काही अडचण नाही. मात्र पक्षाने ज्यांना दिले त्यांना अधिक हवे आहे. त्यांच्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रत्येक संधी आपल्यालाच मिळायला हवी असे काहींना वाटते. ते लगेच नाराज होतात. माझ्यावर अन्याय झाल्या असे बोंबा ठोकतात. मात्र पक्षासाठी खस्ता खाल्ल्या त्यांना काहीच मिळाले नाही याचाही प्रत्येकाने विचार करावा.

संपादन - अथर्व महांकाळ