Winter Session : हिवाळी अधिवेशनाच्या तारखेवरून गोंधळ! उपसचिवाचे परिपत्रक व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिवाळी अधिवेशन

हिवाळी अधिवेशनाच्या तारखेवरुन गोंधळ! उपसचिवांचं पत्रक व्हायरल

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचे ठिकाण आणि तारीख अद्याप निश्चित झाले नसताना कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थेबाबत विधानमंडळ सचिवालयाच्या उपसचिवांच्या परिपत्रकाने चांगलाच गोंधळ उडाला आहे. समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या परिपत्रकात सात डिसेंबरपासून नागपूरमध्ये अधिवेशन होणार असल्याचे म्हटले आहे. निवासी व्यवस्थेसाठी कर्मचाऱ्यांना आपआपली नावे कळवण्याची सूचना देण्यात आली आहे.

हिवाळी अधिवेशन सात डिसेंबरला घेण्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. त्यानुसार हे परिपत्रक काढण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिवेशनाच्या तयारीसाठी सुमारे १५ दिवस आधी नागपूरला यावे लागते. त्यांची व्यवस्था सर्वप्रथम केली जाते. हा नियमित कामकाजाचा भाग असल्याने स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे.

अधिवेशन कुठे घ्यावे याविषयी महाविकास आघाडीत मतभेद आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा नागपूरला अधिवेशन घेण्यास विरोध आहे. चार-पाच दिवसांच्या अधिवेशनावर कोट्यवधींचा खर्च करण्याऐवजी तेवढा निधी विदर्भाला उपलब्ध करून देण्याची तयारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शवली आहे.

शिवसेनेचा सुरुवातीपासूनच नागपूर अधिवेशनाला विरोध आहे. मात्र, काँग्रेस आणि भाजप हिवाळी अधिवेशन नागपूरलाच घ्यावे यासाठी आग्रही आहे.नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने अधिवेशन पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यास तत्वःहा मंजुरीसुद्धा दिल्याचे कळते. दुसरीकडे अधिवेशनासंदर्भात कामकाज सल्लागार समितीची अद्याप बैठकसुद्धा झालेली नाही. अधिवेशनाच्या तयारीसाठी किमान एक महिन्याचा कालावधी स्थानिक प्रशासनाला द्यावा लागतो.

हेही वाचा: ‘दंगल पूर्वनियोजित कशी हे सिद्ध करा अन्यथा तुमचाही कुठेतरी हात’

कामांना थांबा

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फेत आमदार निवास, रविभवनाची रंगरंगोटी केली जाते. याशिवाय मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांसाठी इतर सुविधाही उपलब्ध करून द्याव्या लागतात. अधिवेशनाची तारीख निश्चित नसल्याने सर्व कामे थांबवण्यात आली आहे. अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याचे सर्वच मंत्री व लोकप्रतिनिधी खाजगीत सांगत आहे. अशात उपसचिवांच्या स्वाक्षरीचे १८ डिसेंबरला जारी झालेले परिपत्रक समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने गोंधळ उडाला आहे.

loading image
go to top