अमरावती बंद : दंगल पूर्वनियोजित कशी हे सिद्ध करा; रवी राणा यांचे यशोमती ठाकूर यांना आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Ravi Rana-Minister Yashomati Thakur

‘दंगल पूर्वनियोजित कशी हे सिद्ध करा अन्यथा तुमचाही कुठेतरी हात’

अमरावती : त्रिपुरा घटनेचे पडसाद अमरावतीत चांगलेच उमटले. यामुळे दगडफेक करण्यापासून लाठीचार्ज करण्यात आला. संचारबंदी लावण्यात आली. तसेच इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. ही दंगल पूर्वनियोजित होती असा अहवाल सायबर विभागाकडून प्राप्त झाला आहे. यामुळे अमरावतीत झालेली दंगल पूर्वनियोजित कशी होती, याचा खुलासा पालकमंत्र्यांनी करावा, अशी मागणी बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केली आहे.

त्रिपुरा घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात मोर्चा काढण्यात आला. यावेळी दुकाने बंद करण्याच्या कारणावरून गोटमार झाली. यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. दुसऱ्या दिवशी भाजपने बंद पुकारला होता. मात्र, बंदला हिंसक वळण प्राप्त झाले. यावेळी दंगलच झाली. कुठे गोटमार, तर कुठे शस्त्र निघाले.

हेही वाचा: जिला मुलगी म्हटले तिलाच केले गर्भवती; शेजाऱ्याचे कृत्य आले समोर

बंदला हिंसक वळण प्राप्त झाल्याने पोलिसांना कठोर निर्णय घ्यावं लागले. मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात कराव लागले. अमरावतीत झालेल्या दंगलीला सर्वच स्तरावरून विरोध झाला. सत्तापक्ष व विरोधक एकमेकावर आरोप करीत सुटले. परिस्थिती आटोक्यात आली असली तरी निर्बंध लागू आहेत. अशात अमरावतीमध्ये झालेली दंगल पूर्वनियोजित होती, असा अहवाल सायबर विभागाने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे दिला. दंगल पूर्वनियोजित कशी होती याचा खुलासा पालकमंत्र्यांनी करावा, अशी मागणी अमरावती बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केली आहे.

तुमचाही कुठेतरी हात

सरकार तुमचे आहे. पोलिस विभाग तुमचा आहे. जर हे सर्व पूर्वनियोजित होत तर एवढा मोठा मोर्चा का काढू दिला? दुसऱ्या दिवशी जो गोंधळ झाला तो पूर्वनियोजित होता तर तुमच्याकडे पोलिस विभाग असताना तुम्ही थांबवला का नाही? तुम्ही काय कारवाई केली? हे कारस्थान कोणाच आहे? हे लोकांसमोर आणा, अन्यथा हे घडविण्यामागे तुमचाही कुठेतरी हात आहे, असा आरोप आमदार रवी राणा यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर केला आहे.

loading image
go to top