Winter Session : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पहिलं अधिवेशन कधी झालं ? दीडशे वर्षांची आहे परंपरा

आज पासून महाराष्ट्र विधिमंडळाचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू
Winter Session
Winter Sessionesakal
Updated on

नागपूर : आज पासून महाराष्ट्र विधिमंडळाचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. शिवसेनेतील दोन गटातील वाद, बेळगाव सीमावाद असे प्रश्न पेटले असल्यामुळे तब्बल दोन वर्षांनी नागपूर येथे होत असलेले हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

Winter Session
Maharashtra Assembly Winter Session 2022: कामकाज सुरु होण्याआधी विरोधकांकडून शिंदे गटाविरोधात घोषणा

महाराष्ट्राच्या विधिमंडळाला देशात आगळी-वेगळी अशी प्रतिष्ठा लाभली आहे. अनेकविध क्षेत्रांत देशपातळीवर नेतृत्व देणारे नेते या विधिमंडळाने राष्ट्राला दिले आहेत. या नेत्यांनी संसदीय लोकशाही आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाद्वारा सबळ प्रशासनाचा वस्तुपाठ इतरांना घालून दिला आहे आणि मोठी परंपरा, संकेत व आदर्श निर्माण केले आहेत.

Winter Session
Pregnency Tips : अजब नियम! बाळंतपणात रडण्या-ओरडण्यावर आहे बंदी

अभूतपूर्व मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलची पहिली बैठक दिनांक २२ जानेवारी १८६२ रोजी मुंबई येथील टाऊन हॉलच्या दरबार हॉलमध्ये भरली होती. मुंबई प्रांताचे तत्कालीन गवर्नर सर जॉर्ज रसेल क्लार्क हे त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

Winter Session
Pregnency Tips : प्रेग्नेंट आहात? तर मग नक्की खा ही फळ

१८६२ ते १९३७ या पंच्याहत्तर वर्षांच्या विधिमंडळाच्या प्रदीर्घ वाटचालीत सर्वश्री जगन्नाथ शंकर शेठ, जमशेटजी जीजीभॉय, सर माधवराव विचुरकर, रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक, रावबहादूर गोपाळ हरी -देशमुख ऊर्फ लोकहितवादी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, सर फिरोजशहा मेहता, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले व डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर असे दिग्गज सन्माननीय सदस्य म्हणून लाभले, ज्यांनी आपल्या महान कर्तृत्वाने आणि सर्वकष कामगिरीने या विधिमंडळाला उच्चस्तर व प्रतिष्य प्राप्त करून दिली.

Winter Session
Holiday Calendar 2023 : पुढचं वर्ष खाणार सगळ्या सुट्ट्या; वीकेंडलाच आले आहेत सगळे सण

भारताच्या घटनात्मक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९३५ चा भारत सरकार कायदा (Govt. of India Act, १९३५) अस्तित्वात आला, ज्यात संघराज्यात्मक शासन पद्धती (Federal form of Govt.) स्वीकारण्यात आली होती. तसेच, प्रातांना स्वायत्तता देण्यात आली होती. या कायद्यान्वये विधानसभा व विधानपरिषद असे नामाभिधान देऊन दोन सभागृहे मुंबई प्रांतात १९३७ मध्ये अस्तित्वात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com