esakal | Crime : पतीच्या प्रेयसीला घरात घुसून पेटविले, संतापलेल्या पत्नीचं कृत्य
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पतीच्या प्रेयसीला घरात घुसून पेटविले, संतापलेल्या पत्नीचं कृत्य

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

नागपूर : दोन मुलांची आई असलेल्या पतीच्या प्रेयसीला पत्नीने घरात घुसून रॉकेल ओतून पेटवून दिले. पतीने पत्नीला विरोध करीत प्रेयसीचा जीव वाचविला. ही विचित्र घटना जरीपटक्यात भीमसेनानगर झोपडपट्टीत घडली. या प्रकरणी पतीच्या प्रेयसीच्या तक्रारीवरून महिलेविरुद्ध गुन्हा (nagpur crime) दाखल करण्यात आला.

हेही वाचा: शिवलीला पाटीलच्या किर्तनाचे आयोजन आले अंगलट, गुन्हा दाखल

पतीच्या प्रेयसीचे नाव उषावती असून त्या गंभीररित्या भाजलेल्या आहेत. त्या रेल्वे विभागात नोकरीला आहेत. त्यांच्या पतीचा मृत्यू झाला असून त्यांना दोन मुले आहेत. मुले अजनी वसाहत येथे राहतात. उषाचे शेराबाबू या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे मुलांना सोडून त्या शेराबाबूच्या घरी एका खोलीत राहत होत्या. दरम्यान, शेराबाबू आणि उषा यांच्या अनैतिक संबंधाची माहिती शेराबाबूची पत्नी रश्मी यांना समजली. तेव्हापासून त्यांच्यात खटके उडत होते. १८ जून २०२१ रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास त्या घरी आल्या. त्यावेळी शेराबाबू, त्याची आई माया आणि पत्नी रश्मी या आपसात जोरजोरात ओरडून गाडीची किस्त भरायची आहे असे बोलत होते. उषाला पैसे मागा अशी रश्मी म्हणत होती. शेराबाबूने उषाला पैसे मागितले असता तिने पैसे दिले नाही. त्यानंतर उषा या बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलविण्यास गेल्या असता तीनही लोक स्वयंपाक खोलीत होते. रश्मीने उषाच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. तिला जळत्या अवस्थेत बघताच शेराबाबूने प्रेयसीच्या अंगावर पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळवले.

दोन दिवस ती घरीच होती. त्यानंतर तिच्या मुलाने तिला दवाखान्यात भरती केले. तेथून तिला कुणाल हॉस्पिटल येथे भरती केले. त्यावेळी उषा बयान देण्यासाठी सक्षम नसल्याने तिचे बयान घेता आले नाही. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी तिचे बयान घेण्यात आले. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top