esakal | 'मुलांनो! मला माफ करा...यापुढे मी तुम्हाला आईचे प्रेम देऊ शकत नाही', पतीच्या विरहात पत्नीची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

woman committed to suicide in nagpur

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोटमध्ये राहणाऱ्या उमेश गुंजाळ यांच्यासोबत राखी यांचे लग्न झाले होते. त्या पतीसह अकोटमध्ये राहत होत्या. कंपनीत नोकरीवर असलेल्या उमेश यांना १५ वर्षाचा मुलगा तर ८ वर्षाची मुलगी आहे.

'मुलांनो! मला माफ करा...यापुढे मी तुम्हाला आईचे प्रेम देऊ शकत नाही', पतीच्या विरहात पत्नीची आत्महत्या

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : पतीसोबत क्षुल्लक कारणावरून वाद घालून माहेरी आलेल्या पत्नीने पतीच्या विरहात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना हुडकेश्‍वरमध्ये उघडकीस आली. राखी उमेश गुंजाळ (३६) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

हेही वाचा - कारमध्ये सापडले सहा पेट्या जिलेटिन; दोघांना अटक, दहशतवादविरोधी पथकाची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोटमध्ये राहणाऱ्या उमेश गुंजाळ यांच्यासोबत राखी यांचे लग्न झाले होते. त्या पतीसह अकोटमध्ये राहत होत्या. कंपनीत नोकरीवर असलेल्या उमेश यांना १५ वर्षाचा मुलगा तर ८ वर्षाची मुलगी आहे. सुखी संसार सुरू असताना पती-पत्नीत क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यामुळे गेल्या दिवाळीला राखी या दोन्ही मुलांना घेऊन माहेरी निघून आल्या. तेव्हापासून त्या एटी महामंडळ खात्यातून निवृत्त झालेल्या वडिलांसह राहत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या तणावात होत्या. मुलांना वडिलांची आठवण येत होती तर त्यांनाही पतीसोबत बोलून नव्याने संसार थाटायचा होता. परंतु तसे होऊ शकले नाही. राखी यांनी सोमवारी मध्यरात्री सर्वजण झोपेत असताना घरात सिलींग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री एक वाजता राखी यांचे वडिल लघुशंकेला उठले असता त्यांना राखी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला. दोन्ही मुलांनी आईच्या मृतदेहाला धरून रडणे सुरू केले. हुडकेश्‍वर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

हेही वाचा - विद्यार्थ्यांनो, परीक्षेत संधी हुकली तर घाबरू नका; तक्रारीसाठी ‘कॉलेज लॉगीन’ला सोय

कुणालाही जबाबदार धरू नका -
'मी माझ्या स्वमर्जीने आत्महत्येचा निर्णय घेत आहे. माझ्या मृत्यूस कुणालाही जबाबदार धरू नये. मुलांनो मला माफ करा...मी तुम्हाला यापूढे आईचे प्रेम देऊ शकत नाही' असा उल्लेख राखी यांनी सुसाईड नोटमध्ये केला. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे.

loading image