
नागपूर : महिलांना अधिक व्याजाचे आमिष दाखवित, एका महिलेने १९ महिलांची ७ लाख ३४ हजार रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी एकता अनिरुद्ध टेकाडे (वय ३५, रा. गायत्रीनगर, झिंगाबाई टाकळी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून महिलेविरोधात फसवणूक आणि विविध कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.