सोशल मीडियाचा असाही फायदा, सर्वांच्या डोळ्यातून तरळले आनंदाश्रू...

woman gives birth to a girl in the opposite situation at Nagpur
woman gives birth to a girl in the opposite situation at Nagpur

नागपूर : गोधनी बोखारा येथील परिसरात गोसावी समाजाचे 18 कुटुंब राहत आहेत... हे कुटुंब मैदानात तंबू बांधून वास्तव्य करीत आहेत... दिवसभर शहरात फिरून बेंटेक्‍सचे दागिणे, सौंदर्य प्रसाधने विकणे हे त्यांचे काम... मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांचे काम थांबले... आली ती उपासमारीची वेळ... संघर्ष वाहिणी व इतर सामाजिक संघटनांनी अन्नधान्य, जेवण आणि मदतीचा ओघ सुरू केला. मात्र, राठोड कुटुंबाची व्यथा वेगळीच... एकीकडे लॉकडाऊन दुसरीकडे शासकीय रुग्णालयात उपचार होणार नसल्याने राठोड कुटुंबावर मोठे संकट कोसळे... अशात मिळालेल्या मदतीने त्यांची समस्या सुटली... 

दिवसभर मोलमजुरी करणारे... पालात राहणारे लखन राठोड यांची पत्नी किरण ही नऊ महिन्यांची गर्भवती... तिचे हे तिसरे बाळंतपण... पहिल मुल दगावल... दुसरी मुलगी सुखरूप... पहिल्या दोन्ही प्रसुती सिजर झाल्याने तिसरेही सिजर करणे आवश्‍यक होते. मात्र, तिसरे अपत्य असल्याने शासकीय योजनेचा लाभ मिळणार नव्हता... त्यामुळे राठोड कुटुंबाची चिंता वाढली... 

लॉकडाऊनमुळे काम थांबल्याने आधीच उपासमारीची परिस्थिती... यात खासगी रुग्णालयाचा खर्च कसा करावा, हा प्रश्‍न लखन राठोड यांना सतावत होता. सिजर करावे लागणार असल्याने काही अनुचित होईल, हा घोर त्यांना लागला होता. लॉकडाऊनच्या काळात संघर्ष वाहिनीचे पदाधिकारी तसेच जिल्हा बाल कल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष राजीव थोरात तेथील उपाशी कुटुंबांच्या मदतीसाठी प्रयत्न करीत होते. किरण राठोडची परिस्थिती त्यांच्या लक्षात आली. राजीव थोरात यांनी किरणच्या बाळंतपणासाठी मदत करण्याचे आवाहन सोशल मीडियावर केले. 

ही माहिती डॉ. रोहिणी पाटील यांना समजली. सामाजिक कार्यकर्त्यांच्या आवाहनाला साद देत डॉ. रोहिणी पाटील यांनी लागलीच थोरात यांना फोन करून किरणचे ऑपरेशन नि:शुल्क करण्याचा व इतर व्यवस्था करण्याचा विश्‍वास दिला. त्यांच्या सुचनेप्रमाणे थोरात यांनी स्वत:च्या गाडीने शुक्रवारी किरणला डॉ. पाटील यांच्या लक्ष्मीनगर येथील रुग्णालयात आणले. अगदी वेळेवरच तिला आणल्याने त्यांनी लगेच ऑपरेशनची तयारी केली आणि प्रसूती केली.

गोंडस मुलीचा जन्म

डॉ. रोहिणी पाटील यांनी मदतीचा हात दिल्याने थोरात यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. यावेळी सोनोलॉजिस्ट डॉ. जपे, बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय मराठे व भूलतज्ज्ञ डॉ. पांढरीपांडे हे मदतीसाठी तयार होते. सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि किरणने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता दोघेही सुखरूप असल्याचे डॉ. रोहिणी पाटील यानी सांगितले. या वाईट परिस्थितीत सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com