ज्येष्ठ नागरिकांना बँकेचे उत्तर ‘त्रास होत असेल तर खाते बंद करा!’

The work of senior citizens is a headache for the bank
The work of senior citizens is a headache for the bank

कळमेश्वर (जि. नागपूर) : स्थानिक बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक ग्राहकांशी उद्धट वागतात. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दहा किलोमीटर परिक्षेत्रात असलेली एकमात्र शाखा ‘त्रास होत असेल तर खाते बंद करा’ असे उत्तर ज्येष्ठ नागरिकांना सुनावत आहे.

एकीकडे ज्येष्ठ नागरिक व पेन्शनधारकांना भंडावून सोडणाऱ्या या बँकेने नियुक्त केलेल्या बँक मित्रांना (CSP) चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे कळमेश्वर शाखेतच राबवून घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आर्थिक व्यवहारात पेपरलेस अर्थात ऑनलाईन करून आधारकार्डाद्वारे नागरिकांना बँकेच्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी स्थानिक बँक ऑफ इंडियाने चार बँक मित्रांची नियुक्ती केली.

ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, अपंग विधवा, पेन्शनर पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी शहरात येऊ शकत नाही. वार्धक्य व असहायतेमुळे वारंवार त्यांना शहराचे बँकेत येणे शक्य होत नाही. शासनाच्या विविध सामाजिक योजना श्रावण बाळ, संजय गांधी विधवा सहायता योजना, शेतकरी मानधन योजना, अपंग इत्यादी योजनांमार्फत देण्यात येणाऱ्या पैशासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करायचे.

बँकेच्या कार्यक्षेत्रातील उबाळी, उपरवाही, धापेवाडा व घोराड या गावांमध्ये बँक मित्रांची नियुक्ती केली. या बँक मित्रांना आपल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये दररोज नागरिकांना बँकेच्या सुविधा पुरवायच्या आहेत. परंतु, बॅंकेत तसे न होता या बँकमित्रांना बँकेतच कामाला जुंपून येथील व्यवस्थापक कर्जवसुली व इतर कार्यालयीन कामे करून घेत असल्याने समजते.

व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा
व्यवस्थापकास विचारणा केली असता, ‘यह सब जगह ऐसाही हैं’, असे उद्धटपणे उर्मट उत्तर दिले. संबंधितांनी गंभीरतेने दखल घेऊन ज्येष्ठ, असहाय, विधवा महिला पुरुष ग्राहकांना सर्व बँकेच्या सुविधा त्याच्या प्रत्येक गावात पुरविण्याच्या शासनाच्या धोरणाची अवहेलना करणाऱ्या व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. 
- सुनील चुनारकर,
कळमेश्वर ग्राहका सेवा समितीचे अध्यक्ष व न. पं. सदस्य

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com