worker health Service clinics relying on untrained doctor
worker health Service clinics relying on untrained doctor

अप्रशिक्षित डॉक्टरांच्या भरवशावर सेवा दवाखाने; कामगारांच्या आरोग्याशी खेळ

‘मोठ्या डॉक्टरांशी भेटायचंय १२ वाजता या’

नागपूर : कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्यसेवेसाठी विदर्भात १८ सेवा दवाखाने आहेत. मात्र कोरोनाच्या भयावह काळात सेवा गट ‘ब’ वैद्यकीय अधिकाऱ्यांची १०० टक्के, तर गट ‘अ’ वैद्यकीय अधिकाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. एमबीबीएसची पदवी घेऊन प्रशिक्षणासाठी आलेल्या डॉक्टरांच्या भरवशावर डिस्पेन्शरीतील रुग्णसेवा सुरू असून कामगारांच्या आरोग्याचा खेळ मांडला असल्याची माहिती पुढे आली आहे.

भाजपाच्या काळात राज्य कामगार विमा योजनेचे रूपांतर राज्य कामगार विमा सोसायटीत झाले. विदर्भातील २ लाखांवर विमाधारक कामगारांचे आरोग्य सांभाळण्यासाठी विदर्भात एकमेव राज्य कामगार विमा रुग्णालय सोमवारीपेठेत तर अमरावती, अकोला, हिंगणघाट आणि चंद्रपूर येथे सेवा दवाखाने आहेत. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाडी, बुटीबोरी, कळमेश्वर, कामठी, हिंगणारोड, वानाडोंगरी येथे सेवा दवाखाने असून येथील सेवा अप्रशक्षित डॉक्टरांच्या भरवशावर आहे. रिक्त पदे भरण्यावर तत्कालिन भाजपचे शासन असताना अंकुश लावण्यात आला होता. प्रभारी वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात येण्याची वेळ निश्चित नाही. यामुळे सेवा दवाखान्यांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या बंधमुक्त डॉक्टर रुग्ण तपासत असल्याची तक्रार रुग्णांकडून करण्यात आली.

वाडीतील डिस्पेंसरीतील लेटलतिफी

शनिवारी वाडी सेवा दवाखान्यात आल्यानंतर डॉक्‍टरांच्या चेंबरसमोर उभा होतो, परंतु डॉक्टर आलेच नाही. रुग्णालयात गर्दी नाही पण दोन तासापासून डॉक्‍टरचा पत्ताच नाही. अखेर प्रशिक्षणार्थी डॉक्टरकडे जाऊन तपासणी केली, असे उत्तर एका रुग्णाने दिले. वाडी सेवा केंद्रातील सर्वात चिंतेचा व चिड आणणारे चित्र म्हणजे येथे कर्तव्यावर असलेल्या प्रभारी विमा वैद्यकीय अधिकाऱ्यांची लेटलतिफी. रुग्णालय सुरू होण्याची अधिकृत वेळ १० वाजताची आहे. आणि सेवा दवाखाना बंद होण्याची वेळ ५ वाजून ४५ मिनिटांची आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी १० ला कधीच येत नाही. प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर येतात. जमेल तेवढ्या रुग्णांना तपासतात.

दोन औषधनिर्माण अधिकारी आहेत. अकराच्या ठोक्‍यानंतरच रुग्णालयात येतात. इतर कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी संबंध नाही, मात्र ते दिसतात. रुग्ण बिच्चारे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतिक्षेत असतात. मुख्य डॉक्टरांबद्दल विचारताच प्रशासकीय कामकाजासाठी बाहेर गेले असे उत्तर मिळाले. शनिवारी सुटीचा दिवस असताना प्रशासकीय कामकाज कोणते? हा सवाल आहे.

हा सेवा दवाखाना की, कचरा घर…

रुग्णालयाची खरी ओळख तेथील परिसरावरून होते. प्रथमदर्शनी रुग्णालयाचा दर्शनी भाग स्वच्छ दिसायला हवा. परंतु वाडी येथील सेवा दवाखान्यात प्रवेश करताच पांढऱ्या बेडशीटने झाकलेले टेबल. कचऱ्याचे ढिगाऱ्यासारखे येथे कार्डवर टाकलेल्या पांढऱ्या बेडशीट नजरेस पडतात. येथील सेवा दवाखान्यात पाय ठेवायची इच्छा होत नाही. कित्येक दिवसांपासून या डिस्पेंन्सरीची स्वच्छता केली नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सेवा दवाखान्यातील रिक्तपदांची आकडेवारी

  • पद - मंजूर पदे - भरलेली पदे - रिक्त पदे

  • गट ‘अ’ - वैद्यकीय अधिकारी - ३५ - १८ - १७

  • गट ‘ब’ - वैद्यकीय अधिकारी - १९ - ०० - १९

एमबीबीएस पदवीनंतर एक वर्ष ग्रामीण भागात सेवा बंधनकारक केली आहे, तो बॉंड मुक्त व्हावा यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर नेमतात. त्यांच्या भरवशावर कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य आहे. हा एकप्रकारे त्यांच्या आरोग्याशी खेळ आहे. ही तक्रार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे करण्यात येणार आहे.

- अनिकेत कुत्तरमारे, अध्यक्ष- प्रीयदर्शी सम्राट अशोक बहुद्देशीय संस्था.

या प्रकरणाची तक्रार अद्याप आली नाही. वाडी डिस्पेंसरीमधील कर्मचाऱ्यांशी संवादातून किंवा चौकशीतून सत्य बाहेर येईल. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. सेवा दवाखाने कामगार व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यसेवेसाठी आहेत.

- डॉ.स.रा. नलगुंडवार, वैद्यकीय प्रशासन अधिकारी, नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com