आता ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करणार तरी कोण? कर्मचारी गेले बेमुदत संपावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Workers of Self Help Group are on  On indefinite strike

तालुका अभियान व्यवस्थापक कक्षातील यांच्या सांगण्यावरून यांच्या मागण्या,अभियान२०११पासून व्यवस्थितरीत्या सुरू असून आज महिलांच्या जीवनामध्ये त्यांच्या उपजीविकेमध्ये वाढ झाली आहे

आता ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करणार तरी कोण? कर्मचारी गेले बेमुदत संपावर

अंबाडा (जि. नागपूर):  तालुक्यात अतिशय जोमाने चालणारा महिलांना सक्षम बनविणे हेच ध्येय सरकारनी ठेवले होते यामधूनच गावोगावी स्वयंसहायता बचत गटांची निर्मिती करण्यात आली परंतु शासनाने त्रयस्थ संस्थेचा हस्तक्षेप केल्यामुळे या विभागाचे सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान(उमेद) अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष नरखेड यांनी सुद्धा आपला सहभाग नोंदविला आहे. महाराष्ट्र राज्य कर्मचारी कल्याणकारी मंडळाने घेतलेल्या काम बंद आंदोलनाच्या सहभागमध्ये आपला सहभाग नोंदवून ग्रामविकास विभागाने घेतलेला त्रयस्थ संस्थेचा हस्तक्षेप केल्याबाबत बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. 

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

तालुका अभियान व्यवस्थापक कक्षातील यांच्या सांगण्यावरून यांच्या मागण्या,अभियान२०११पासून व्यवस्थितरीत्या सुरू असून आज महिलांच्या जीवनामध्ये त्यांच्या उपजीविकेमध्ये वाढ झाली आहे महिलांचे जीवनमान उंचावण्याचा मोठयाप्रमाणात मदत झाली आहे. गावास्तरावर महिलांच्या संस्था उभ्या झाल्या आहेत.

महिलांचे छोटेमोठे रोजगार निर्माण झाले आहे बऱ्याच महिला स्वतःच्या पायावर उभ्या झाल्याचे चित्र आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचे बळकटीकरण झालेल्या संस्था शासनाच्या हेकेखोर पणामुळे तसेच त्रयस्थ संस्थेच्या निर्णयामुळे आज या सर्व संस्था तसेच सर्व महिला बचतगट बंद पडण्याची भीती वर्तवली जात आहे. 

अधिक वाचा - महाविकास आघाडीत बिघाडी; काँग्रेसने उमेदवार दिल्यावरही राष्ट्रवादीची  पदवीधर निवडणुकीत उडी 

शासनाकडून येणारा निधी महिला स्वयंसहायता गटाकरिता येणारा निधीं बंद केला आहे या सर्व बाबी जोपर्यंत त्रयस्थ संस्थेचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यन्त कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय पंचायतसमिती नरखेड येथील बी एम कुंभरे तालुका व्यवस्थापक,एस बी गतपणे तालुका व्यवस्थापक,प्रभाग सामुदायिक,एन एम गूढधे,पी ए गोसावी तसेच तालुक्यातील सर्व कॅडर यांनी निषेध नोंदवला आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

loading image
go to top