मोठा रंगमंच, डौलदार नेपथ्य अन् त्यावरील अभिनय, कुठं हरवलंय सर्व?

file image
file imagecanva

नागपूर : एक भला मोठा रंगमंच... त्यावर डौलदार नेपथ्य... डोळे विस्फारणारी नेत्रदीपक प्रकाश योजना... मन प्रसन्न करणारे संगीत... त्यावर अभिनयाचा जडलेला साज... या ना अशा अनेक माध्यमातून आपण आजवर कलेकडे बघत आलो आहे. मात्र, कोरोनाने घेतलेल्या एन्ट्रीनंतर या सर्व कलांनी एक्झिट घेतली आहे. त्यामुळे, रंगमंचावर भावनांना वाट करून देणाऱ्या या कलांसाठी नवे माध्यम निर्माण करण्याची गरज असल्याचे मत कला क्षेत्रातील तज्ज्ञांनी जागतिक कला दिनानिमित्त व्यक्त केले.

हेही वाचा - कुख्यात गुंडाच्या तब्बल सात शाळा, गुन्हेगारीच्या पैशातून उघडल्या शिक्षण संस्था

सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व्हर्च्युअल पद्धतीने सादर होत असल्याने यामध्ये नेपथ्य, चित्रपटाचे सेट किंवा इतर ललित कलांना दुय्यम स्थान मिळत आहे. शिवाय, कोरोनामुळे जमाव किंवा प्रेक्षक एकत्रित येऊ शकत नसल्याने या कलेचा जीवंतपणाचा आस्वाद घेण्यासाठी कुठलाही वर्ग उपलब्ध होऊ शकत नाहीये. त्यामुळे, विविध कौशल्याने परिपूर्ण असलेले कलावंत आपली कला जगासमोर मांडण्यासाठी नव-नव्या माध्यमांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - तूरसह हरभरा डाळीच्या दरात वाढ, साखरही महागणार

नव्या पिढीच्या विचार करायचा झाल्यास चित्रकला, मूर्तिकला प्रदर्शन किंवा कार्यशाळा भरविणे सोशल मीडियामुळे एका हाताचा खेळ झाला आहे. मात्र, रंगांचे ज्ञान, कलेतील बारकावे, अचूकता शिकविण्यासाठी व प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे, नव्या पिढीसह कलावंत घडविणाऱ्या कला शिक्षकांसमोर नवे आवाहन निर्माण झाले आहे.

कलेविषयीचे तांत्रिक ज्ञान भावी पिढीला देणे व्हर्च्युअल माध्यमांमुळे सोपे झाले आहे. तसेच, ज्ञानाचा लाभ घेणाऱ्यांचा आवाकासुद्धा वाढला आहे. मात्र, विद्यार्थी प्रात्यक्षिक अनुभवू शकत नाहीत. व्हर्चुअल माध्यमांमुळे कलेचा अनुभव घेण्यावर मर्यादा आल्या आहेत.
-विश्वनाथ साबळे, अधिष्ठाता, कला विभाग, सर जे जे स्कूल ऑफ आर्ट, मुंबई.
प्रेक्षक आमची कला बघतात तेव्हा पुढे काही तरी करण्याचा आम्हाला हुरूप येतो. मात्र, सध्या प्रेक्षक आणि कलावंतातील हा संवाद थांबला आहे. कलावंताने येथेच न थांबता आपल्यातील कल्पकतेचा वापर करीत कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावी. प्रेक्षकांपर्यंत कला नक्कीच पोहोचते.
- श्रद्धा पाटील, कला दिग्दर्शक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com