World Parkinsons Day 2024 : लिहिताना अक्षर लहान लहान होतात?सावध व्हा..! चोर मार्गाने येतोय पार्किन्सन आजार

World Parkinsons Day 2024 : सध्या या रोगाचे ८ ते ९ लाख रुग्ण आपल्या देशात असून दहा वर्षांत ते प्रमाण दुप्पट होईल. पुरुषांमध्ये याचे प्रमाण दीडपटीने अधिक आहे.
World Parkinsons Day 2024
World Parkinsons Day 2024esakal

World Parkinsons Day 2024 : अचानक हाथ-पाय कडक असतील, पाठीचा कान वाकला असेल, चालताना अडचण तसेच अचानक खाली पडत असाल आणि विशेष म्हणजे लिहिताना अक्षरांचा आकार लहान होतो आणि अक्षर वेडेवाकडे होत असतील तर तत्काळ मेंदूरोग तज्ज्ञांकडे जा. ही लक्षणे चोर मार्गाने येणाऱ्या ‘पार्किन्सन’ या रोगाची असू शकतात, असे निरीक्षण मेंदूरोग तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

सध्या या रोगाचे ८ ते ९ लाख रुग्ण आपल्या देशात असून दहा वर्षांत ते प्रमाण दुप्पट होईल. पुरुषांमध्ये याचे प्रमाण दीडपटीने अधिक आहे. ४० वर्षे वयोगटाखालील नागरिकांमध्येसुद्धा हा आजार दिसून येतो.

ही लक्षणे दिसताच घ्या डॉक्टरांचा सल्ला

  • शरीरात कंपन सुटणे

  • सर्वच हालचालीत संथपणा

  • चालताना तोल जाणे,

  • हातापायाला कडकपणा

  • नैराश्य आणि चिंता

  • तोंडातून लाळ गळते

कुठल्या वयात किती रुग्ण

  • ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे ८० टक्के रुग्ण

  • ४० ते ६० वर्षे वयोगटातील २० टक्के रुग्ण

  • ४० वर्षांपेक्षा कमी वयामधे किशोर पार्किन्सन

स्वत: औषधोपचार कधीच करू नये. दुष्परिणाम होतील. पार्किन्सन आजारात स्टेम सेल थेरपीचा वापर करू नये. अद्याप संशोधन सुरू आहे. ज्या रुग्णांनी सुरुवातीला औषधांना प्रतिसाद दिला आणि नंतर त्या औषधांचा प्रभाव कमी झाला त्यावेळी डीप ब्रेन स्टिम्युलेशन सारख्या शस्त्रक्रियेसाठी विचार करता येतो. ही खर्चिक आहे, मात्र सर्वांनाच या शस्त्रक्रियेची गरज नसते.

यात वेदना आणि पोटाचे विकार, बद्धकोष्ठता, चिंता आणि नैराश्य येते. जीवनाची गुणवत्ता कमी होते. यामुळे आजारापासून दूर राहण्यासाठी ताणतणावापासून दूर राहावे. योग्य आहार विहारावर लक्ष द्यावे.

-डॉ. चंद्रशेखर मेश्राम, विश्वस्त-वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com