World Photography Day 2025: एका क्लिक सरशी साठवली जाते कायमची आठवण! आज जागतिक छायाचित्रण दिवस
Photography Art: जगातील प्रत्येक क्षणाला लेन्समधून अमरत्व देणाऱ्या या कलाविष्काराचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी ‘जागतिक छायाचित्रण दिन’ साजरा केला जातो. प्रत्येक फोटो एक कथा सांगतो, जी काळाच्या पलीकडे जाऊनही जिवंत राहते.
नागपूर : प्रत्येक क्षण आपल्या लेन्समधून पकडून तो कायमस्वरूपी जपण्याचे सामर्थ्य छायाचित्रणात आहे. एका क्लिक सरशी कायमची आठवण साठवली जाते. या अद्वितीय कलाविष्काराचा सन्मान दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी ‘जागतिक छायाचित्रण दिनी’ केला जातो.