
अश्विनी म्हारोळकर- पाचखेडे
ऑटिझम हा एक असा आजार आहे ज्यामध्ये मुलाच्या मेंदूचा योग्य विकास होत नाही. त्यांना रोजच्या जगण्यासाठी नेहमीच मदतीची आवश्यकता भासते. अशा मुलांचे प्रमाण भारतातच नव्हेतर आपल्या विदर्भातही वाढत आहे. विदर्भात प्रत्येक ७० मुलांमागे एक मूल स्वमग्नतेचे शिकार आहे. नागपुरात तर १०० मुलांमागे ५ मुले ऑटिझमने ग्रस्त आहेत.
गेल्या दशकात जगभरात ऑटिझमच्या प्रमाणात कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. भारतात आज ऑटिझमचे प्रमाण ८८ मुलांमागे एक इतके दिसू लागले आहे. यातही मुलांमध्ये हे प्रमाण मुलींपेक्षा चारपट जास्त दिसत आहे. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. १२ ते १३ महिन्याच्या बालकांमध्ये ऑटिझमची लक्षणे दिसून येतात.