अरे व्वा... भारतीय श्वानांना मिळणार हक्काचे घर; पण कसे काय, वाचा सविस्तर 

Wow ... Indian Dogs Will Get Their Home
Wow ... Indian Dogs Will Get Their Home
Updated on


नागपूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.३०) ‘मन की बात़'मध्ये श्वानपालनासाठी आत्मनिर्भरतेवर भर देत भारतीय प्रजातीच्या श्वानांना दत्तक घेण्याचे आवाहन केले. त्यामुळे परदेशी प्रजातींना श्वानप्रेमापोठोपाठ आता भारतीय प्रजाती पालनाकडे अश्वप्रेमी वळतील आणि त्यांना हक्काचे घर मिळेल असा दावा श्वासप्रेमीनी केला आहे. पशुप्रेमी करिश्मा गिलानी या भारतीय प्रजातीच्या श्वानांना दत्तक देण्याचा उपक्रम अनेक वर्षापासून राबवित असल्याने पंतप्रधानांनी भारतीय श्वानांना दत्तक घेण्याचा उल्लेखाबद्दल गिलानी यांनी त्यांचे आभार मानले. 

भारतीय श्वास सर्वात उपेक्षित असून, अतिशय कठीण परिस्थितीत जीवन जगत आहे. त्यातुलनेत परदेशी प्रजातींना श्वानप्रेमींकडून हक्काचे घर मिळत आहे. त्यामुळेच रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या अस्सल भारतीय प्रजातीकडे श्वानप्रेमींचे लक्ष वेधण्यात पंतप्रधानांचे आवाहन मोलाचे ठरणार आहे. शिकार आणि राखण यासाठी भारतीय प्रजातीच्या श्वानाची ओळख आहे. त्यात मुधोळ हाऊंड, कारवान हाऊंड या महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रजाती आहे. यातील मुधोळ हाऊंड श्वास भारतीय लष्कर, सीआरपीएफमध्ये समावेश केला आहे. या कुत्र्याच्या प्रजातीचा इतिहास शंभर वर्षे जुना आहे. फार पूर्वीच्या काळात छत्रपती शाहू महाराज शिकारीसाठी जात तेव्हा त्यांच्यासोबत कुत्रा असे. त्या काळात शेतकरीही आपल्या शेताच्या तसेच घराच्या राखणदारीसाठी भारतीय कुत्र्यांची निवड करण्यात येते. 

बीड येथील मुधोळ हाऊंड या भारतीय कुत्र्यांचा उल्लेखही पंतप्रधानानी आपल्या भाषणात केला. यामुळे भारतीय कुत्र्यांच्या पालनाकडे नागरिक वळतील. येथील पशुप्रेमी करिश्मा गिलानी या गेल्या १२ वर्षापासून भारतीय कुत्र्यांसाठी दत्तक योजना राबवित आहे. त्यांचा उद्देश म्हणजे शहरातील लहान कुत्र्यांच्या पिल्लांना हक्काचे घर मिळून द्यावे हा आहे. तसेच गावातील कुत्र्यांची संख्या नियंत्रणात रहावी हा प्रयत्न आहे. 

कोरोनामुळे देशात सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली होती. तेव्हा मानवांना दोन वेळचे अन्न मिळावे म्हणून शासनाने त्यांच्यासाठी विविध योजना राबविल्या. त्यामुळे त्यांना दोनवेळचे अन्न मिळाले. तसेच अनेक सामाजिक संस्थांच्या पुढाकारानेही गरीब व सर्वसामान्य कामगारांना अन्न धान्य पुरविण्यात आले. त्याच दरम्यान, करिश्मा गिलानी यांच्या पुढाकारने शहरातील बेवारस कुत्र्यांना टाळेबंदीच्या काळात दररोज खाद्यान्न पुरविण्यासाठी सामाजिक संस्थांसह नागरिकांनकडे मदत मागीतली. त्यांना अनेक सामाजिक संस्था आणि नागरिकांना भरभरून प्रतिसद दिला होता. 
 

पंतप्रधानांच्या आवाहनाला मिळेल प्रतिसाद 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये भारतीय कुत्र्यांना दत्तक घेण्याचे आवाहन केल्याने त्याचा चांगला परिणाम भविष्यात दिसणार आहे. यामुळे भारतीय कुत्र्यांना दत्तक घेण्याचे प्रमाण वाढेल. गाव आणि शहरातील श्वानांचे प्रमाण कमी होईल. गेल्या १२ वर्षापासून भारतीय कुत्र्यांना दत्तक घेण्याचा कार्यक्रम आमच्या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. त्यासाठी मनपाचे सहकार्य मिळत आहे. 
करिश्मा गिलानी, सचिव पिपल्स फॉर ॲनिमल. 

 भारतीय कुत्र्यांना पाळणे सुलभ 
दत्तक अभियान हे नागपुरात सुरू झाले आहे. भारतीय कुत्र्यांना पाळणे सुलभ आहे. विदेशी कुत्र्यांना पाळणे कठीण आहे. लावारीस कुत्र्यांची अडचण दुर होणार आहे. भारतीय कुत्र्यांना दत्तक घेण्याचे प्रमाण वाढेल. चांगला उपक्रम आहे. 
दीपक लालवानी, विश्वस्त, पिपल्स फॉर ॲनिमल.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com