esakal | #UPMeinGundaraj : वडेट्टीवार, ठाकूर यांचे टार्गेट ‘भाजप’
sakal

बोलून बातमी शोधा

#UPMeinGundaraj : वडेट्टीवार, ठाकूर यांचे टार्गेट ‘भाजप’

#UPMeinGundaraj : वडेट्टीवार, ठाकूर यांचे टार्गेट ‘भाजप’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : उत्तर प्रदेशातील स्थानिक निवडणुकीत नामनिर्देशित अर्ज भरण्यासाठी जाणाऱ्या समाजवादी पक्षाच्या महिलेशी नेत्याशी एका व्यक्तीने गैरवर्तणूक केली. ही घटना लखीमपूर खेरी पोलिस स्टेशन हद्दीत घडली होती. याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थानिक भागातील पोलिस कर्मचाऱ्यांसह सर्कल अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. मात्र, यशोमती ठाकूर यांनी ट्विट करीत राज्यातील भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे. भाजप मधल्या सगळ्या आऊटसोर्स ‘ताई-माई अक्का’ आज गायब असतील, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केले आहे. (Yashomati-Thakur-and-Vijay-Vadettiwar-tweeted-against-BJP)

उत्तरप्रदेशमध्ये स्थानिक निवडणुका लागल्या आहे. निवडणुकीसाठी महिला रितू सिंह या निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या असता तेथील भाजप कार्यकर्त्याने त्यांच्यासोबत गैरवर्तणूक केली होती. सोबतच कार्यकर्त्याने हल्ला केल्याच रितू सिंह यांचे म्हणणे आहे. योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशमध्ये महिला नेत्याशी झालेल्या गैरवर्तणुकीवर मंत्री यशोमती ठाकूर कडाडल्या आहे. यशोमती ठाकूर यांनी ट्विट करीत राज्यातील भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा: ‘ट्विट’वार : आम्ही कशाला म्हणणार ‘चंपा’ किंवा ‘टरबुज्या’

तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘भाजप शापित उत्तर प्रदेशमधील निवडणुका’ असे काँग्रेसने शेअर केलेले ट्विट शेअर केले आहे. या ट्विटमध्ये ‘यूपी में भाजपा की गुंडागर्दी ने लोकतंत्र को कलंकित किया है। भाजपा ने चुनावी जीत अर्जित करने के लिए महिला जन प्रतिनिधियों का चीरहरण, अपहरण, मार-पिटाई कर लोकतंत्र पर प्रहार किया है। भाजपा के अहंकार, गुंडागर्दी और आतंक का जवाब यूपी की जनता वोट की चोट से देगी।’ असे लिहिलेले आहे. तसेच बारा ठिकाणचे व्हिडिओही त्यात शेअर केलेले आहे.

(Yashomati-Thakur-and-Vijay-Vadettiwar-tweeted-against-BJP)

loading image