
दारव्हा : येथील उपजिल्हा रुग्णालयातील मद्य प्राशन करून सेवेत असलेल्या डॉक्टरने एका जिवंत रुग्णाला सुरवातीला मृत घोषित केले. त्यानंतर त्याच्या शवविच्छेदनाची तयारी केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. २६) रात्री घडला.या प्रकाराने संतापलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉक्टरला चांगलेच धारेवर धरले. रुग्णाला यवतमाळ येथे रेफर करण्यात आले. सध्या रुग्ण सुस्थितीत आहे.