Truck Hits Bike Rider Dead : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या अचानक यू-टर्नमुळे दुचाकीस्वार रामेश्वर गावंडे (वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक अपघातानंतर फरार असून हिंगणा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
धामणा लिंगा : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील धामणा (लिंगा) शिवारातील वेदांत ढाब्याजवळ सोमवारी (ता.११) दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.