esakal | आई आणि तिने मिळून निवडले तांदूळ अन्‌ वरच्या माळ्यावर निघून गेली

बोलून बातमी शोधा

Young girl commits suicide in Nagpur

घरी लग्नाची तयारी सुरू असल्याने आनंदाचे वातावरण होते. रविवारी दुपारी आई आणि तिने मिळून तांदूळ निवडले. दुपारी 3.35 वाजता ती वरच्या माळ्यावर गेली. सिलिंग फॅनला ओढणी बांधून तिने गळफास लावून लावला. काही मिनिटात आई काही कामानिमित्त वर गेली असता सुरभी गळफास लावलेल्या अवस्थेत दिसताच हंबरडा फोडला.

आई आणि तिने मिळून निवडले तांदूळ अन्‌ वरच्या माळ्यावर निघून गेली
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दोन भावांची एक लाडकी बहीण... कुटुंब तसे गरीबच... वडिलांनी ऑटो चालवून तिन्ही मुलांना शिक्षण दिले. मुलगी वयात आल्यामुळे स्थळ शोधायला सुरुवात केली. दोन महिन्यांपूर्वी मुलीचे लग्न जुळले आणि महिनाभरापूर्वी साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडला. सर्वकाही सुरळीत सुरू होते. घरात लग्नाची तयारी सुरू होती. अशातच मुलीने तणावातून आत्महत्या केली. सुरभी कुडवे (24, रा. वकीलपेठ, साउथ पॉइंट शाळेमागे) असे मृत मुलीचे नाव आहे. 

दोन भावांची एकुलती एक बहीण असल्याने सुरभी घरात सर्वांची लाडकी होती. वडील ऑटोचालक आहेत. त्यांनी मोठ्या परिश्रमाने तिन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले. सुरभीने बीकॉमची पदवी घेतली. दोन महिन्यांपूर्वी तिचे लग्न ठरले आणि महिनाभरापूर्वी साक्षगंध झाले. 

जाणून घ्या - भाजलेले मासे खाताय ...मासोमारीसाठी होतोय कीटकनाशकांचा वापर

घरी लग्नाची तयारी सुरू असल्याने आनंदाचे वातावरण होते. रविवारी दुपारी आई आणि तिने मिळून तांदूळ निवडले. दुपारी 3.35 वाजता ती वरच्या माळ्यावर गेली. सिलिंग फॅनला ओढणी बांधून तिने गळफास लावून लावला. काही मिनिटात आई काही कामानिमित्त वर गेली असता सुरभी गळफास लावलेल्या अवस्थेत दिसताच हंबरडा फोडला. यामुळे सुरभीचा लहान भाऊ आणि शेजारी मदतीला धावून आले. तिला तातडीने खाली उतरवून मेडिकलमध्ये नेले. पण, तोवर बराच उशीर झाला होता. डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. 

माहिती मिळताच सुरभीसोबत संसाराचे स्वप्न रंगविणारा मुलगाही पॉंडेचरीहून विमानाने आला. थरथरत्या हाताने तिचे अंत्यदर्शन घेतले. दुपारनंतर सुरभीची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी उपस्थितांना हुंदके आवरणेही कठीण झाले होते. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

आता वेदना सहन होत नाही

सुरभीने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली. त्यात तिने डोक्‍यात विचारांची गर्दी झाली आहे. यामुळे रोज रात्री हृदयात धाकधूक होते. त्याचा मला त्रास होतो. पण, आता कोणालाच त्रास देणार नाही. माझीच चूक आहे, मला माफ करा, अशा शब्दांत तिने आपल्या वेदना व्यक्त केल्या असून, मी अविचारी नसल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.