
नागपूर : जुन्या पसाऱ्यामध्ये आजही आपल्याला एक पैसा, पाच पैसे, दहा पैसे दिसले की आपण त्याच्याशी निगडीत अनेक आठवणींना उजाळा देतो. मग, दोनशे वर्षांपेक्षा जुनी नाणी समोर आल्यानंतर काय अवस्था होईल. शूर राजे महाराजांच्या इतिहासाला उजाळा देणाऱ्या नाण्यांचा असा वारसा नागपूरमध्येच पाहायला मिळतो. ॲड. मकरंद जोगवार अशा वस्तू जपत आहेत.