esakal | नागपूर : तरुणाने बाईकसह घेतली तलावात उडी
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : तरुणाने बाईकसह घेतली तलावात उडी

नागपूर : तरुणाने बाईकसह घेतली तलावात उडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूरच्या फुटाळा तलावात एका युवकाने बाईकसह उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी (ता. १२) उघडकीस आला. त्या युवकाने आत्महत्या का केली? हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. नागरिकांकडून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव अथर्व आनदेवार असल्याची प्राथमिक माहिती आहे. (Young-man-commits-suicide-in-Nagpur)

प्राप्त माहितीनुसार, फुटाळा तलाव नागपुरात चांगलाच प्रसिद्ध आहे. येथे सामान्य नागरिकांसह प्रेमीयुगुलाची नेहमी रेलचेल असते. पिकनिक स्पॉट म्हणून युवकांमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. मात्र, कोरोना आल्यापासून येथील वर्दळ चांगलीच कमी झाली आहे. अन्य दिवशी सायंकाळच्या सुमारास पाय ठेवायला जागा नसते. आज दुपारी तलावावर अचानक खळबळ अडाली.

हेही वाचा: बारावीच्या विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या

दुपारच्या सुमारास एक युवक दुचाकी घेऊन तलावाजवळ आला. कोणताही विचार न करता तसेच कुणालाही काही समजण्याचा आत त्याने दुचाकीसह तलावात उडी घेतली. तेथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस लगेच घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी मच्छीमारांच्या मदतीने युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाईकशिवाय त्यांच्या हाती काहीही आले नाही. अग्निशमन दलाच्या माध्यमातून युवकाचा शोध घेणे सुरू आहे. युवकाने आत्महत्या का केली हे अजूनही स्पष्ट झाले नाही. युवकाने टोकाचे पाऊल का उचलले, असा प्रश्न उपस्थितांना पडला आहे.

(Young-man-commits-suicide-in-Nagpur)

loading image