esakal | बारावीच्या विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

बारावीच्या विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या

बारावीच्या विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिग्रस (जि. यवतमाळ) : तालुक्यातील कलगाव येथील बारावीच्या विद्यार्थिनीने घरी पाइपला ओढणी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी उघडकीस आली. प्रेरणा राजू कायटे (वय १८) असे मृताचे नाव आहे. या घटनेने गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (The-student-committed-suicide-by-hanging-herself)

कायटे कुटुंबातील सर्व सदस्य शनिवारी रात्री नऊ वाजता जेवन करून आपापल्या खोलीत झोपायला गेले. मध्यरात्री प्रेरणा हिने घरातील मध्यभागी असलेल्या पाइपला ओढणी बांधून गळफास लावून जीवन संपविले. ही बाब रविवारी उघडकीस आली. याबाबत दिग्रस पोलिसांना माहिती दिल्यावर त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

हेही वाचा: शिवसेनेच्या दोन गटात राडा! मास्क न लावल्याच्या कारणावरून वाद

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, प्रेरणा येथील दिग्रस येथील महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत होती. मात्र, तिने आत्महत्या का केली, हे अद्याप कळू शकले नाही. तिच्या मागे आईवडील व भाऊ असा आप्तपरिवार आहे. याप्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत तुमराम व ओमप्रकाश नाटकर करीत आहेत.

(The-student-committed-suicide-by-hanging-herself)

loading image