esakal | मैत्रिणीने धरला अबोला; चिडलेल्या युवकाने तिच्या बहिणीला पाठवले अश्‍लील फोटो

बोलून बातमी शोधा

The young man sent bad photos to her sister after girlfriend caught Abola Nagpur crime news

आदित्यने तिच्या बहिणीला इंस्टाग्रामवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि तिचे काही फोटो कॉपी केले. त्यानंतर तिच्या नावाचे बनावट इंस्टा अकाऊंट तयार केले. त्या अकाऊंटवरून तिच्या बहिणीचे मॉर्फ केलेले फोटो, अश्‍लील एसएमएस आणि व्हिडिओ तो शेअर करायला लागला.

मैत्रिणीने धरला अबोला; चिडलेल्या युवकाने तिच्या बहिणीला पाठवले अश्‍लील फोटो
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : इंस्टाग्रामवरून अनैतिक संबंध, प्रेमसंबंध प्रस्थापित झाल्यानंतर मित्रांनी बलात्कार, विनयभंग, अश्‍लील चाळे किंवा शारीरिक संबंधाची मागणी केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. इंस्टाग्रामवरून ओळखी झाल्यानंतर तरुणींची बदनामी होणारे कृत्य अनेकांनी केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. अशीच एक घटना कपिलनगरात समोर आली आहे. एकतर्फी प्रेम करणाऱ्या इंस्टाग्राम फ्रेंडने चॅटिंग बंद केल्याने चिडून तिच्या बहिणीला अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ पाठवले आणि तिला बलात्कार करण्याची धमकी दिली. या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आदित्य राठोड असे आरोपीचे नाव आहे.

सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन क्लासमुळे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आहे. क्लासेस संपल्यावर युवा वर्ग फेसबुक, वॉट्‍सॲप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वेळ घालवतात. कपिलनगरात राहणारी १६ वर्षीय मुलगी अकरावीची विद्यार्थिनी आहे. तिच्या इंस्टाग्रामवर आदित्य राठोड नावाच्या युवकाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने एक्सेप्ट केल्यानंतर दोघांचे चॅटिंग सुरू झाले.

अधिक वाचा - नितीन गडकरी यांचा इशारा कोणाला? गटबाजी फोफावल्याचे केले मान्य

दोघांनी एकमेकांच्या आवडीनिवडी, राहण्याचे पत्ते आणि आपापल्या कुटुंबाची माहिती शेअर केली. आदित्य त्या मुलीवर एकर्फी प्रेम करायला लागला. त्यामुळे तो तिला मर्यादासोडून एसएमएस करायला लागला. त्यामुळे तिने त्याच्यासोबत चॅटिंग करणे बंद केले. त्याच्याशी अबोला धरला. त्यामुळे चिडलेला आदित्य तिला धमकी देऊ लागला. तरीही ती मानायला तयार नव्हती. केवळ मैत्री ठेवल्यापलिकडे कोणतेही नाते ठेवणार नाही, असे तिने बजावले.

आदित्यने तिच्या बहिणीला इंस्टाग्रामवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि तिचे काही फोटो कॉपी केले. त्यानंतर तिच्या नावाचे बनावट इंस्टा अकाऊंट तयार केले. त्या अकाऊंटवरून तिच्या बहिणीचे मॉर्फ केलेले फोटो, अश्‍लील एसएमएस आणि व्हिडिओ तो शेअर करायला लागला.

महत्त्वाची बातमी - चोर पावलांनी कमी होतो शरीरातील ऑक्सिजन; पन्नाशी ओलांडलेल्या ७० टक्के कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज

तरुणीने त्याला विचारणा केली असता त्याने तिला बलात्कार करण्याची धमकी दिली. रेप करण्याचे धमकी देणारे एसएमएस पाठवले. त्याचा वाढता त्रास पाहता तरुणीने कपिलनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आदित्यवर गुन्हा दाखल केला आहे.