esakal | पती पर्यटनासाठी गेले अन् घरचा फोन खणखणला; हॅलोऽऽ म्हणताच सरकली पायाखालची जमीन
sakal

बोलून बातमी शोधा

A young man who went to Pachmarhi died of a heart attack Nagpur news

वाटेत जवळ जेवण करून पुढच्या प्रवासाला निघाले. परंतु, पचमढीला पोहोचण्याधीच बंजारा घाटी पार करीत असताना त्यांच्यासोबत असलेल्या आनंद मोतीराम जनबंधू याने चालत्या वाहनांमध्ये उलटी आल्यासारखे व घाबरल्यासाखे वाटत असल्याचे सांगितले.

पती पर्यटनासाठी गेले अन् घरचा फोन खणखणला; हॅलोऽऽ म्हणताच सरकली पायाखालची जमीन

sakal_logo
By
सतीश डहाट

कामठी (जि. नागपूर) : तालुक्यातील नागपूर रोडवरील खैरी ग्रामपंचायतअंतर्गत फॉर्म्स नामक मूर्ती कंपनीमध्ये कार्यरत आनंद मोतीराम जनबंधू (३५, रा. न्यू खलाशी लाईन कामठी) सहकारी १५ मित्रांसह शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी चारचाकी वाहनाने पचमढी येथे पर्यटनाला जायला निघाले. परंतु, पचमढी पोहोचण्याआधीच बंजारा घाटी पार करीत असताना चारचाकी वाहनात हृदयविकाराचा झटका आल्याने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, कामठी तालुक्यातील नागपूर रोडवरील खैरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या फॉर्म्स नामक मूर्ती कंपनीमध्ये कार्यरत १६ कर्मचारी दोन चारचाकी वाहनाने शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पचमढी येथे फिरायला निघाले.

सविस्तर वाचा - पोलिसांना झाले काय? वाहतूक पोलिस शाखेत एटीपीच्या नावाखाली वसुलीबाज युवक

वाटेत जवळ जेवण करून पुढच्या प्रवासाला निघाले. परंतु, पचमढीला पोहोचण्याधीच बंजारा घाटी पार करीत असताना त्यांच्यासोबत असलेल्या आनंद मोतीराम जनबंधू याने चालत्या वाहनांमध्ये उलटी आल्यासारखे व घाबरल्यासाखे वाटत असल्याचे सांगितले.

परंतु, घाटीमध्ये काही साधन नसल्याने पुन्हा पंधरा ते वीस किलोमीटर अंतर वाहन चालवत जावे लागले. खासगी रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने वेळेवर उपचार मिळू शकला नाही. नंतर छिंदवाडा पोहोचायला रात्रीचे बारा वाजले होते. परंतु, खाजगी रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने वेळेवर उपचार मिळू शकला नाही. शेवटी एक हॉस्पिटल मिळाल्याने तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.

जाणून घ्या - मेहूणीशी असभ्य वर्तन जावयाला भोवले; विनयभंग व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा

याची लगेच माहिती कामठी स्थित आनंदच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यांना बातमी ऐकून धक्काच बसला. आनंदचा मृतदेह घेऊन शनिवारी सकाळी सहा वाजता कामठी येथे पोहोचले. मृतदेह बघताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास राणी तलाव मोक्षधाम येथे आनंदवर शोकमग्न वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत आनंदचे तीन वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याला पत्नी, आई व एक दोन वर्षांची मुलगी आहे.

loading image
go to top