esakal | मेहूणीशी असभ्य वर्तन जावयाला भोवले; विनयभंग व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Crime in Amravati for molestation and death threats

पीडितेसह तिची आई संशयित आरोपीची समजूत काढण्यासाठी बाहेर आली. तेव्हा संशयिताने पीडितेला पकडून असभ्य वर्तन केले. परिसरातील लोकांपुढे बहिणीच्या पतीनेच केलेल्या गैरवर्तनाची तक्रार पीडितेने बडनेरा ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध विनयभंग व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

मेहूणीशी असभ्य वर्तन जावयाला भोवले; विनयभंग व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : मेहूणीसोबत असभ्य वर्तन करणे जावयाच्या अंगलट आले. बडनेरा पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

बडनेरा परिसरात संबंधित महिला आपल्या आईसह घरात असताना मोठ्या बहिणीचा पती त्याठिकाणी पोहोचला. त्याने पत्नी आहे काय? अशी विचारणा पीडितेला केली. त्याची पत्नी घरात नसल्याचे सांगितल्यावरही तो तेथून जायलाच तयार नव्हता. त्याने मेहूणीच्या घरावर दगडफेक करून शिवीगाळ सुरू केली.

सविस्तर वाचा - समाजमन सुन्न: लग्नासाठी कर्जबाजारी वडील पैसे कुठून आणणार या चिंतेतून मुलीने संपवले जीवन

पीडितेसह तिची आई संशयित आरोपीची समजूत काढण्यासाठी बाहेर आली. तेव्हा संशयिताने पीडितेला पकडून असभ्य वर्तन केले. परिसरातील लोकांपुढे बहिणीच्या पतीनेच केलेल्या गैरवर्तनाची तक्रार पीडितेने बडनेरा ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध विनयभंग व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

डिमांड करणे दिवाणजीच्या आले अंगलट

शेतात मजुरीसाठी आलेल्या महिलेकडे कामाव्यतिरिक्त डिमांड करणे दिवाणजीच्या चांगलेच अंगलट आले. तळेगावदशासर ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. सदर शेतात मजुरी करण्यासाठी काही महिला गेल्या होत्या. पीडितेला शेतातील दिवाणजीने एक छोटी चिठ्ठी सोपवली.

जाणून घ्या - मन सुन्न करणारी घटना! राज्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या भावाचा अंत्यविधी सुरू असताना मृत्यू

त्या चिठ्ठीचे वाचन पीडितेने केले असता तिचा पार चढला. त्यात दिवाणजीने महिलेकडे असभ्य शब्दाचा वापर करून डिमांड केली होती. पीडितेने तळेगाव दशासर ठाण्यात तक्रार नोंदविली. प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

loading image
go to top