भांडण सोडविण्यासाठी गेलेल्याचा खून; अल्पवयीन मुलासह दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्याचा खून; अल्पवयीन मुलासह दोघांना अटक

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्याचा खून; अल्पवयीन मुलासह दोघांना अटक

नागपूर - दारु पिल्यानंतर माझासाठी का थांबला नाही? असा प्रश्‍न विचारत घरात शिरुन भांडण करणाऱ्याने ते भांडण सोडविण्यासाठी आलेल्या व्यक्तीचाच खून केला. ही घटना पारडीतील मॅा अंबे नगरात मंगळवारी (ता.२६) सायंकाळी पावणे आठच्या सुमारास घडली.

विनोद उर्फ गुडडु तोरण निर्मलकर (वय ३२, रा. मॉ अंबे नगर, नागोबा मंदिरजवळ, पारडी) असे आरोपीचे नाव असून नेमलाल पतीराम गडे (वय ५८, रा. मॉ अंबे नगर, पारडी) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सांयकाळच्या सुमारास विनोद निर्मलकर, मुकुंदा उर्फ बाबा श्रीराम मते (वय ३९) आणि त्याचे दोन मित्र असे चार जणांनी एच.बी.टाऊन परिसरातील वाईन शॉपमधून दारु घेतली.

त्यानंतर एका सावजी दुकानात जाऊन त्यांनी दारु पिली. दारू पिऊन झाल्यावर मुकुंदा मते आपल्या घरी परत निघून आला. मात्र, याचा विनोदला खूप राग आला. त्याने मुकुंदाला फोन करीत, मला सोडून निघून जातो, तुला बघून घेतो असे धमकाविले. यानंतर काहीच वेळात आपल्या १७ वर्षीय लहान भावासोबत तो मुकुंदाच्या घरी आला. यावेळी मुकुंदा आणि त्याचा मित्र नेमलाल गडे हे दोघेही मासोळी भाजत होते.

विनोदचा आवाज ऐकून मुकुंदा बाहेर आला. तो बाहेर येताच, विनोदने त्याला मारहान करण्यास सुरुवात केली. मुकुंदाचा आवाज ऐकताच नेमलाल बाहेर आला. त्याने विनोदला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, विनोदने त्याला धक्का दिला. यावेळी तो जोरात भिंतीवर आदळला. भिंतीचा कोपरा त्याच्या डोक्याला लागल्याने त्याला जबर दुखापत झाली. तो खाली कोसळला. यावेळी विनोदने त्याच्या छातीवर पाय मारला आणि तिथून निघून गेला. तो जाताच मुकुंदा मते याने नेमीलालला हलविले.

मात्र, त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने बेशुद्ध असल्याचे बघून त्यांनी नेमलाल याला भवानी रुग्णालयात नेले. यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याची माहिती पारडी पोलिसांना दिली असता, त्यांनी रुग्णालय गाठले. यावेळी मुकुंदा याचा तक्रारीवरुन पोलिसांनी विनोद आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल करीत अटक केली. यावेळी पोलिसांनी आज त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केल्यावर त्याची ३० पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

Web Title: Youth Murder Crime Nagpur Criminal Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..