उमरेडमध्ये तरुणाचा खून!

खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट
crime
crimeSakal

उमरेड - शहरात शनिवारी शुभम भोजराज दमडू (वय २५) हा युवक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. घटनेची वार्ता वाऱ्याच्या वेगाने पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी उसळली.

घटनेची माहिती उमरेड पोलिसांना कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे ताफा घेऊन दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणून तपास सुरू केला. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून तरुणाचा मारेकरी कोण हेदेखील स्पष्ट झाले नाही. मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास उमरेड पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com