

Pistol Seized Youth Arrested in Alleged endlife Attempt Plot
esakal
नागपूर: वडीलांच्या मृत्यूनंतर तणावात आलेल्या २३ वर्षीय तरुणाने चक्क आत्महत्या करण्यासाठी त्याच्या साथीदाराकडून पिस्तूल मिळविली. मात्र, काडतूस येण्याची वाट बघत असताना इन्स्टाग्रामवर फोटो टाकल्याने पोलिसांच्या तावडीत सापडला. ही धक्कादायक घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी युवकावर गुन्हा दाखल करीत त्याला पिस्तूलीसह अटक केली आहे.