

Stampede During Yuva Karya Protest March
Sakal
नागपूर : यशवंत स्टेडियम येथे महाराष्ट्र युवा कार्य प्रशिक्षण संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आलेल्या मोर्चादरम्यान आज चेंगराचेंगरीची घटना घडली. गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सौम्य बळाचा वापर करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.